गोणेगाव चौफुला येथे आयोजित संतपूजन व किर्तन सोहळयास प्रतिसाद
नेवासा(प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील गोणेगाव चौफुला येथील रामकृष्ण आश्रमामध्ये वैकुंठवाशी त्रिंबक महाराज दिघे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित संतपूजन व झालेल्या हभप दादाजी महाराज वायसळ यांच्या किर्तन सोहळयास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.रामकृष्णाश्रमाच्या उत्कर्षासाठी त्रिंबकभाऊ दिघे महाराजांचे समर्पण व त्याग मोलाचे असल्याचे प्रतिपादन हभप दादा महाराज वायसळ यांनी यावेळी बोलताना केले
यावेळी बोलतांना हभप वायसळ महाराज पुढे म्हणाले की भगवंतांच्या शरणागतीने व संतांच्या संगतीने केलेल्या परमार्थामुळे मनुष्य जीवाचा संसार सुखाचा होत असल्याने संसार सुखाचा होण्यासाठी संत संगतीत परमार्थ करा असे आवाहन त्यांनी केले.वैकुंठवाशी त्रिंबकभाऊ दिघे महाराजांचे वारकरी संप्रदायासाठी मोठे योगदान लाभले असून महाराज मंडळी व भजनी मंडळाच्या मनामध्ये भाऊंचे आगळेवेगळे स्थान होते त्यांच्यामुळे पारमार्थिक प्रेमाचा सहवास भक्तांना लाभला लाभला.आश्रमाच्या स्थापनेपासून तन मन धनाने त्यांनी जीवन खर्ची केले,रामकृष्ण आश्रमाच्या परंपरा बंद पडू दिल्या नाही त्या जपण्याचे काम त्यांनी केले
यावेळी झालेल्या किर्तन सोहळयाच्या प्रसंगी सीताराम बाबा मगर,रामकृष्ण आश्रमाचे प्रमुख वेदमूर्ती भगवान महाराज जंगले शास्त्री, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख विश्वस्त हभप देविदास महाराज म्हस्के,नंदकिशोर महाराज खरात, ऋषिकेश महाराज वाकचौरे,रामनाथ महाराज पवार, अंजाबापू महाराज कर्डीले,निलेश महाराज रोडे,संतोष महाराज चौधरी,हरि महाराज वाकचौरे,हरि महाराज भोगे,बालू महाराज पडूंरे,मृदुंगाचार्य सुखद महाराज जाधव,गिरीजीनाथ महाराज जाधव,निलेश महाराज रोडे यावेळी उपस्थित होते.
यावेळी बाळकृष्ण महाराज दिघे,रामदास दिघे, दादासाहेब दिघे,दत्तात्रय दिघे,आदिनाथ दिघे,प्रदीप दिघे,विठ्ठल दिघे,सौ.ज्ञानदेव कापसे यांच्या हस्ते संतपूजन करण्यात आले.रामकृष्ण आश्रमाचे प्रमुख महंत हभप भगवान महाराज जगले शास्त्री यांनी वैकुंठवाशी गायनाचार्य हभप त्रिंबक महाराज यांचे वारकरी संप्रदायातील योगदान व जीवनकार्य आपल्या मनोगतातून
व्यक्त केले.
यावेळी बोलतांना हभप वायसळ महाराज म्हणाले की त्रिंबकभाऊ दिघे महाराजांचे वारकरी संप्रदायासाठी मोठे योगदान लाभले,महाराज मंडळी व भजनी मंडळाच्या मनामध्ये भाऊंचे आगळेवेगळे स्थान होते,त्यांना पारमार्थिक प्रेमाचा सहवास लाभला,या आश्रमाच्या स्थापनेपासून तन मन धनाने त्यांनी आपले जीवन खर्ची केले,रामकृष्ण आश्रमाचे संस्थापक वैकुंठवाशी रामकृष्ण काळे गुरुजींच्या नंतर रामकृष्ण आश्रमाच्या परंपरा बंद पडू दिल्या नाही त्या जपण्याचे काम त्यांनी केले असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
वाणी मन कायाने भगवंताला समर्पित होऊन शरण जा, देवा ईतकीच गुरूंची सेवा करा,जीवनात भगवंतांच्या नाम साधनेद्वारे मनुष्य जीवाचा उद्धार करा असे आवाहन हभप दादाजी महाराज वायसळ यांनी यावेळी बोलतांना केले. नामदेव महाराज कंक,गणेश महाराज गायकवाड, पोपट महाराज आघाव,बदाम महाराज पठाडे,विष्णूपंत ठोसर,संभाजीराव कार्ले,पी के रोडे,भाऊसाहेब येवले,कैलास जाधव यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.