*नागापूर सोसायटीचे माजी संचालक बाबासाहेब नवथर यांचा युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश*
नेवासा प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अब्दुलभैय्या शेख हे नेवासा तालुक्यामध्ये सन्मानिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या मान्यतेने आणि युवा नेते पार्थदादा पवार व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरजदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्षाची जोरदार बांधणी करत असून तालुक्यातील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षात इनकमिंग चालू आहे, त्यातच आता नागापूर वि. वि. कार्य. सेवा सोसायटीचे माजी संचालक बाबासाहेब नवथर यांनी अब्दुलभैय्या शेख आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेवासा तालुकाध्यक्ष अशोकराव मोरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्षामध्ये जाहिर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने प्रवेश घेत अभिनंदन केले. बाबासाहेब नवथर यांनी याआधी अनेक पदे भूषवली असून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहत, ते नागापूर सोसायटीचे माजी संचालक, तसेच नागापूर येथिल नागनाथ देवस्थानचे विद्यमान विश्वस्त, नेवासा तालुका भाजपचे कार्यकारणी सदस्य, भाजपचें बूथ प्रमुख म्हणून सुद्धा काम पाहिले असून येणाऱ्या काळात नवथर यांना राष्ट्रवादी नेवासा तालुका कार्यकारणीमध्ये संधी मिळणार आहे. नवथर यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी पक्षाला नेवासा तालुक्यात ताकद मिळत असून नेवासा तालुक्यात सन्माननिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विचार तळागाळात पोहचत आहे.