"कृषि महाविद्यालय सोनई शेतकऱ्यांच्या बांधावर"
मक्तापूर येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी सलग्न कृषि महाविद्यालय सोनईच्या कृषि दुतांच्या पुढाकाराने शेतकरी चर्चासत्र आयोजन करण्यात आले, या चर्चा सत्रात पीक उत्पादन, कीड व्यवस्थापन, खत व्यवस्थापन,आंतरपीक फायदे, आधुनिक शेती, सेंद्रिय शेती या विषयावर सखोल चर्चा झाली.
या चर्चासत्रात प्रमुख तज्ञ प्रा. नरेंद्र दहातोंडे ( कीटक शास्त्र विभाग ) यांनी डाळिंब व पेरू पिकांवरील बुरशीजन्य रोग व कीड नियंत्रण, खत व्यवस्थापन, पीक उत्पादन, आंतरपीक घेण्याचे फायदे, कांदा व ऊस यावरील रोग नियंत्रण, तसेच सेंद्रिय शेती, मृदा परीक्षण, जल व्यवस्थापन, पाणी परीक्षण,आधुनिक शेती पद्धती सेंद्रिय खतांचा वापर कीटकनाशकाची योग्य पद्धत यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
शेती विषयी शेतकऱ्यांना पीक लागवडी पासून ते पीक काढणीपर्यंत जो काही खर्च होतो तो एका वहीत नमूद करून ठेवा, शेतीचा आर्थिक नियोजन कसे करावे याबद्दल सखोल मार्गदर्शन प्रा. राहुल गोंधळी सर ( कृषि अर्थशास्त्र विभाग ) यांनी सांगितले. तसेच कृषी महाविद्यालयाच्या तज्ञांकडून शेतकऱ्यांना आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या वेळी कृषि महाविद्यालयाचे रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल दरंदले, कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल गोंधळी, प्रा. जयसिंग वाघमारे उपस्थित होते.
या शेतकरी चर्चा सत्राला ग्रामविकास अधिकारी श्री. गर्जे डी. व्हि. तंटामुक्ती अध्यक्ष श्री. दत्तात्रय कांगुने, श्री. अनिल लहारे, माजी उपसरपंच श्री. छबुराव बर्डे, श्री. अशोक साळवे, प्रगतशील शेतकरी श्री. लक्ष्मण बर्डे, श्री.अंबादास कांगुने, श्री.भागचंद साळवे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता कृषिदुत नावीन्य रींधे, अभिषेक दरंदले, तुकाराम भोये, तेजस पोपेरे, राहुल सहाने यांच्या समन्वयाने झाली. या चर्चा सत्रातून शेतकऱ्यांना शेतीतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवी प्रेरणा व दिशा मिळाली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरी मोरे सर, उप-प्राचार्य सुनील बोरुडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.