नेवासा तालुक्यातील शासकीय कार्यालय प्रमुखांची आढावा बैठक, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली
नेवासा ( प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील पंचायत समिती सभागृहामध्ये शासकीय कार्यालय प्रमुखांची व त्यांच्या अधिनस्त अधिकारी वर्गाची महत्त्वाची आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान मा.आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी घेतले.
बैठकीत तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांचा सखोल तपास केला गेला आणि संबंधित प्रशासनाने त्यावर योग्य तो प्रतिसाद देण्याबाबत चर्चा केली. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी सर्व खाते प्रमुखांना आदेशित केले की, भविष्यात होणाऱ्या कामांमध्ये जोमाने कार्यवाही करावी, तसेच लोकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात.
याबरोबरच, आमदार मोहेदायनी यांनी विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित अधिकारी व विभाग प्रमुखांना अधिक कार्यक्षमतेने काम करण्याची सूचनाही दिली.
बैठकीत तालुक्यातील विकासकामे तसेच प्रशासनिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले.