नेवासा तालुका ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी


नेवासा तालुका ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या भूमीमध्ये श्रीक्षेत्र संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर भूलोकीचे स्वर्ग असलेले श्रीक्षेत्र देवगड श्रीक्षेत्र शिंगणापूर श्रीक्षेत्र श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिर श्रीक्षेत्र सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आश्रम श्रीक्षेत्र सिद्धेश्वर मंदिर श्रीक्षेत्र त्रिवेनीश्वर श्रीक्षेत्र श्रीराम साधना आश्रम श्रीक्षेत्र खडेश्वरी देवी मंदिर श्रीक्षेत्र मधमेश्वर अशी अनेक तीर्थक्षेत्र नेवासा तालुक्यामध्ये आहेत या तीर्थक्षेत्रामध्ये पारायण सप्ताह सोहळा आणि इतर धार्मिक कार्यक्रम नेहमी होत असतात धार्मिक कार्यक्रम श्रवण करण्यासाठी वारकरी आणि अनेक भाविक भक्त नेहमी येत असतात नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्रांच्या आषाढी वारीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दिंड्या जात असतात
                  नेवासा येथे श्री संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे यांनी ६० ६५ वर्षापूर्वी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचकांनी बसावे यासाठी आग्रह करून प्रयत्न केले नेवासा तालुक्यातील अनेक गावातील भाविक भक्त पारायणास बसण्यासाठी येत असत
                श्रीक्षेत्र देवगड येथे श्री किसनगिरी बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भाविक भक्त श्रीक्षेत्र देवगड या पवित्र ठिकाणी खूप मोठ्या संख्येने अनेक वर्षापासून येत आहे
                श्रीक्षेत्र शिंगणापूर येथील शनैश्वर महाराजांचा दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी अनेक वर्षापासून प्रचंड संख्येने भाविक भक्तांची गर्दी होत आहे
                श्रीक्षेत्र ज्ञानेश्वर मंदिर येथील पारायण सोहळे आणि श्रीक्षेत्र देवगड येथे श्री किसनगिरी बाबा यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी भाविक भक्तांची खूप गर्दी अनेक वर्षापासून होत आहे श्री क्षेत्र ज्ञानेश्वर मंदिर आणि श्री क्षेत्र देवगड श्रीक्षेत्र शिंगणापूर या तीर्थक्षेत्रांची ६० ६५ वर्षांपासून भाविकांना ओढ वाटू लागली अनेक भाविकांच्या अंतःकरणांमध्ये भक्ती करण्याची प्रेरणा मिळाली देव देवतांचे दर्शन धार्मिक कार्यक्रम श्रवण करण्याची आवड हरिभक्त परायण कीर्तनकार कीर्तन करत असताना चिंतनाची आवड खूप भाविक भक्तांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली अशा भाविक भक्तामध्ये पिचडगाव तालुका नेवासा येथील कैलासवाशी अण्णासाहेब तुकाराम हजारे आणि जिजाबाई अण्णासाहेब हजारे हे भाविक भक्त होते
                आई वडील धार्मिक असून त्यांना धार्मिक कार्यक्रम श्रावण करण्याची आणि देवदेवतांच्या दर्शनाची आवड असल्यामुळे त्यांच्या धार्मिक संस्कारामुळे त्यांचे चिरंजीव आदरणीय परमपूजनीय हरिभक्त परायण ज्ञानेश्वरजी महाराज हजारे यांना लहानपणापासूनच भक्ती करण्याची आणि परमार्थाची आवड आहे लहानपणापासूनच आळंदी या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी ते जात असत शालेय शिक्षण घेत असताना गावातील हनुमान मंदिरामध्ये जाऊन हरिपाठ करत असत दहावीची परीक्षा पास झाल्यावर चार वर्ष आळंदी या ठिकाणी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेतले
              अंतःकरणामध्ये भक्ती करण्याची ओढ अतिशय शांत स्वभाव मधुर रसाळ वाणी नम्रतेने आत्मीयतेने आणि विनयशीलतेने बोलणे आणि श्रीक्षेत्र देवगड या पवित्र ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यासाठी आणि दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी नेहमी संपर्क असल्यामुळे आदरणीय परमपूजनीय हरिभक्त परायण गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज यांचे अतिशय जवळचे शिष्य या नात्याने त्यांना आदरणीय परमपूजनीय ह भ प गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराजांचा आशीर्वाद मिळाला आणि अतिशय जवळचे शिष्य झाले
               एकांतामध्ये संत वांग्मय वाचून श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे पंढरीच्या पांडुरंगाचे आणि इतर संतांचे चिंतन करण्यासाठी निवांत व निसर्गमय ठिकाणी आश्रम आणि संत ज्ञानेश्वर मंदिर असावे असा विचार आदरणीय ह भ प ज्ञानेश्वर हजारे महाराजांच्या अंतःकरणामध्ये डोकावत असताना आदरणीय परमपूजनीय हरिभक्त परायण गुरुवर्य शांतब्रह्म श्री भास्करगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने अतिशय जवळचे पाहुणे श्री पेहेरे यांनी विनामूल्य आश्रमासाठी आणि श्री संत ज्ञानेश्वर मंदिरासाठी सभोवताली दाट झाडी असलेली निसर्गमय अशी अतिशय सुंदर जागा दिली
           या जागेवर माऊली आश्रम भाविक भक्तांच्या सहकार्याने पूर्ण झाल्यावर आदरणीय परमपूजनीय ह भ प गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराजांनी या अतिशय पवित्र आणि निसर्गमय असणाऱ्या माऊली आश्रमास भेट दिली त्यांना हा परिसर अतिशय आवडला त्यांनी या ठिकाणी माऊली आश्रमाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि धार्मिक कार्यक्रमासाठी कोणत्या बाबी करण्याची गरज आहे याची सूचना केली त्यांच्या सूचनेनुसारच आदरणीय ह भ प ज्ञानेश्वर महाराज हजारे यांनी मा नामदार शंकररावजी गडाख साहेबांना माऊली आश्रमास भेट देण्याची विनंती केल्यावर आदरणीय नामदार साहेबांनी त्वरित भेट देऊन माऊली आश्रमासाठी विकसित कामे करण्यासाठी अतिशय चांगला रस्ता केला ज्ञानेश्वर मंदिरासमोर सभामंडपासाठी आणि इतर कामासाठी निधी दिला माऊली आश्रमाचा निसर्गमय परिसर दाट झाडी आणि निवांत एकांत वासामध्ये भाविक भक्तांना धार्मिक कार्यक्रम श्रवण करण्यासाठी असलेले ज्ञानेश्वर मंदिर आणि माऊली आश्रम आणि निसर्गरम्य परिसर फार आवडीचे आणि नेहमी नेहमी भेट देण्यासाठी यावे असे वाटते असे प्रशंसनीय उद्गार अनेक वेळेस आदरणीय मा नामदार शंकररावजी गडाख साहेबांनी त्यांच्या मुखांमधून जाहीर सभेमधून काढलेले आहेत श्री क्षेत्र पंढरपूर आणि श्री क्षेत्र आळंदी येथून ह भ प कीर्तनकार आणि वारकरी सांप्रदायामधील महान व्यक्तिमत्व माऊली आश्रम या ठिकाणी प्रवचन कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमासाठी नेहमी येत असतात या ठिकाणी नेहमी भजनाचा कार्यक्रम होत असतो
              शून्यामधून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे महान व्यक्तिमत्व असणारे आदरणीय परमपूजनीय हरिभक्त परायण ज्ञानेश्वरजी महाराज हजारे यांचा नवीन वर्षाच्या पवित्र दिवशी १ जानेवारी २०२५ रोजी वाढदिवस होता आदरणीय परमपूजनीय ह भ प ज्ञानेश्वरजी महाराज हजारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
            आदरणीय महाराजांना उत्तम निरोगी निरामय व समाधानकारक आरोग्य लाभावे आणि उदंड व दीर्घ आयुष्य लाभावे अशी मी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी अंतःकरणापासून नम्र प्रार्थना करत आहे
                 माझी नेवासा तालुक्यातील आणि इतर तालुक्यातील भाविका भक्तांना हात जोडून कळकळीची विनंती आहे माऊली आश्रम श्री संत ज्ञानेश्वर मंदिर आणि परिसरास भविष्य काळामध्ये खूप मोठे धार्मिक तीर्थक्षेत्र होण्यासाठी वाव आहे असे आशीर्वाद रुपी उद्गार आदरणीय परमपूजनीय हरिभक्त परायण गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराजांनी माऊली आश्रम पिचडगाव येथे भेट दिली असताना काढलेले आहे तरी भाविक भक्तांनी आणि दानशूर व्यक्तिमत्त्वांनी आर्थिक सहकार्याचा हातभार लावल्यास अशा महान व्यक्तिमत्त्वांना आदरणीय परमपूजनीय हरिभक्त परायण गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराजांचा आशिर्वाद मिळणार आहे  
                      शब्दांकन
            रामकृष्ण पाटील कांगूणे
               माजी सरपंच मक्तापूर
                      तालुका नेवासा
                 जिल्हा अहिल्यानगर
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.