शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांना नेवासा फाटा येथे अल्पोपहाराचे वाटप!


शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांना नेवासा फाटा येथे अल्पोपहाराचे वाटप!

नेवासा (प्रतिनिधी) - शौर्यदिनानिमित्त भीमा कोरेगांव येथील विजयस्तंभाला आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी बुधवार (दि.१) रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जात असतांना नेवासा फाटा येथे नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती पावलस गोर्डे मिञ मंडळाकडून स्वागत करुन अल्पोपहार देण्यात आला.

    यावेळी नेवासा फाटा येथील शेवंताबाई वृद्धाश्रम चॅरिट्रेबल ट्रस्टचे अध्यक्ष शशिकुमार कसबे,संजय आगळे,माजी सभापती पावलस गोर्डे,दयानंद खिलारी,भास्कर लिहीणार,प्रदिप चक्रणारायण आदींनी आंबेडकरी चळवळीतील अनुयायांचे नेवासा फाटा येथे गुलाब पुष्प देवून जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले नेवासा फाटा येथील हॉटेल सनि पॅलेसच्या प्रांगणात आंबेडकरी अनुयायांना अल्पोपहार वाटप करण्यात आला सकाळपासूनच नगर - छञपती संभाजीनगर महामार्गावरुन भिमा कोरेगांवकडे जाण्यासाठी रस्त्यावर सर्वञ निळे वादळ यावेळी पसरलेले असल्यामुळे नेवासा तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील काही शिक्षकांनी एकञ येत भिमा कोरेगांवकडे जाणाऱ्या समाज बांधवांचे स्वागत करुन त्यांना सकाळपासूनच अल्पोपहार वाटप करण्यासाठी चळवळीतील मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी सन्नी पाटोळे,नितीन कांबळे,बाबा साळवे,शेखर पाटोळे,बुथवेल हिवाळे,फ्रँन्सिस खंडागळे,कडूबाळ मोरे,किशोर गव्हाणे,प्रदिप चक्रणारायण यांच्यासह चळवळीतील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.


चौकट

येथील शेवंताबाई वृद्धाश्रम चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शशिकुमार कसबे आणि नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती पावलस गोर्डे यांच्या मिञ मंडळांकडून वर्गणी करुन चळवळतील अनुयायी भिमा कोरेगांव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जात असतांना सकाळपासूनच अल्पोपहार करण्यासाठी विशेष नियोजन केले होते. 
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.