*वृक्ष लागवड घोटाळा प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे फेर चौकशीची मागणी*
( नेवासा प्रतिनिधी ) - नेवासा नगर पंचायतीमध्ये झालेल्या वृक्ष लागवड घोटाळा प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे आज फेर चौकशीची मागणी करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, नेवासा नगर पंचायतीकडून चौदाव्या वित्त आयोगामधून नेवासा शहरात अट्ठेचाळीस लाख रुपये खर्चाची सुमारे अठराशे वृक्ष लागवडीची निविदा काढण्यात आली होती.सदरचे टेंडर हे ड्रॅगनफ्लाय नर्सरी ( प्रो. प्रा.ऋतुराज जोशी ) यांना देण्यात आले होते. तर प्रत्यक्षात मात्र राजकीय हस्तक्षेपातून शहरातील काहींनी हे टेंडर स्वतः कडे घेऊन ही लागवड करण्याचा फक्त बहाणा केला.वृक्ष लागवडीनंतर एक वर्ष जोपासना करून सदर वृक्ष नगरपंचायतकडे सुपूर्द करणे असे नमूद करण्यात आले होते.परंतु निविदेत नमूद वृक्ष लागवड करण्यात आलीच नाही उलट एक वर्षाच्या नंतर अठराशे वृक्ष हस्तातरण सुद्धा करण्यात आले नाही. याहीपेक्षा नगरपंचायतीने कोणतीही शहानिशा न करता लाज घेऊन सुमारे अठ्ठावीस लाख रुपयाची बिले ठेकेदारास अदा करण्यात आली. सध्या शहरात अठराशे सोडा दहा वृक्ष देखील लावलेले आढळून येत नाही. नेवासा काँग्रेसने या सर्व प्रकरणाची दाखल घेत, आक्रमक भूमिका घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. सादर प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती. सदर प्रकरणात चौकशी झाली सुनावणी देखील झाल्या. प्रकरण तालुक्यात गाजले देखील परंतु प्रशासनाने प्रशासनाला पाठीशी घालत क्लीन चिट देत मुख्याधिकारी यांना दिलासा दिला. त्यामुळे सदर प्रकरण गुलदस्त्यात टाकण्यात आले. आज तक्रारदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे,काँग्रेस शहराध्यक्ष अंजुम पटेल यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत सदर प्रकरणाची फेर चौकशीची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांना चौकशीचे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी तातडीने फेर चौकशी करण्यात येईल असे स्पष्ट केले. निवेदनावेळी बसपाचे युवा नेते हरीश चक्रनारायण,कैलास बोर्डे, इलीयास शेख आदी उपस्थित होते.
*चौकट* - वृक्ष लागवड घोटाळ्याचा पर्दाफास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यात कितीही हस्तक्षेप केला तरी दोषी अधिकारी, ठेकेदार, यांच्याकडून काढलेल्या रकमेची वसुली करणे गरजेचे आहे. तर शहराचे वाट लावणाऱ्याणा येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत जनता जागा दाखवून देईल - संभाजी माळवदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी..