कुकाना येथे हजरत सय्यद बाबा न्यायमत शहावली बाबा साहेब यांचा जंगी उरूस व हागामा
नेवासा प्रतिनिधी : हजरत सय्यद न्यामत शहावली बाबा यांचा सालाबाद प्रमाणे याही वर्षी जंगी उरूस विविध मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच दोन दिवस जंगी हगामा कुस्त्या यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. कुकाणा येथे बुधवार दिनांक. ४ डिसेंबर रोजी कावडी संदल, गुरुवारी उरूस व छबीना, शोभेची दारू कव्वाली, शुक्रवारी कुस्त्यांचा हगामा, शनिवारी कुस्त्यांचा हगामा तसेच सिनेमा, मनोरंजन कार्यक्रम, जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी उपस्तित राहण्याचे आव्हान यात्रा कमिटी वतीने केले आहे.
उरूस बाबत माहिती देताना अब्दुल भैय्या शेख आणि शकूर शेख यांनी सांगितले की, सर्व धर्मीय व्यक्ती या उरूसमध्ये सहभागी होत असतात. यावर्षी यात्रेमध्ये सर्व कुकाणा ग्रामस्थ तसेच पंच क्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस कर्मचारी व यात्रा कमिटीच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
यात्रा कमिटीचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, अब्दुल भैय्या शेख, बालम भाई शेख, भाऊसाहेब फोलाने, बाळासाहेब कचरे, भारत गरड, इस्माईल शेख, बालम भाई शेख, एकनाथ कावरे, अमोल अभंग यांच्यासह अन्य सदस्य उरूसाचे नियोजन करत आहेत.
या वेळी दरगाहवर भेट दिली. यामध्ये विलासराव देशमुख, राष्ट्रवादीचे अब्दुल भैय्या शेख, पत्रकार अनिल गर्जे सर, श्रीकांत शिंदे पाटील, गणेश चौगुले सर आदी उपस्थित होते.