नेवासा तालुक्यात स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडच्या गळीत हंगामाचा शुभारंभ
नेवासा : आज माळेवाडी दुमाला, ता. नेवासा येथे स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रथम गळीत हंगामाच्या शुभारंभ सोहळ्याला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या ऐतिहासिक क्षणी नेवासा तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार माननीय श्री विठ्ठलराव लंघे पाटील यांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेतला. प.पु. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, ह.भ.प. स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज आणि तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. पुरुषोत्तम मोरे महाराज यांच्या शुभाशीर्वादाने हा सोहळा अधिक मंगलमय झाला.
गळीत हंगामाचा शुभारंभ मा. श्री. दादा भुसे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रमुख व्यक्तिमत्त्वांनी त्यांचे मार्गदर्शन केले. मा. श्री. विजयबापू शिवतारे (चेअरमन), डॉ. ममताताई शिवतारे-लांडे (कार्यकारी संचालक) आणि श्री. विनस विजयबापू शिवतारे (संचालक) यांच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने या उद्योगाची परंपरा पुढे नेली जात आहे.
या कार्यक्रमाला महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती होती, ज्यात मा. श्री. शिवदीप लांडे (पोलीस महासंचालक, बिहार राज्य), मा. श्री. अब्दुल भैय्या शेख (राष्ट्रवादी युवा नेते), मा. श्री. काकासाहेब शिंदे (पंचगंगा शुगर संचालक), मा. श्री. सचिनभाऊ देसरडा (भाजपा संयोजक), मा. श्री. अंकुशराव काळे (भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष), मा. श्री. प्रताप चिंधे, मा. श्री. विनोद ढोकणे, मा. श्री. अमित गडोखे, मा. श्री. अनिल शेठ लोखंडे, मा. श्री. मोहनराव काळोखे, मा. श्री. सस्ते साहेब आणि श्री. अनिल शेठ लोखंडे (संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, पुणे) यांचा समावेश आहे.
हा शुभारंभ केवळ एका उद्योगाचा प्रारंभ नाही, तर शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला मिळालेली मान्यता असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. "शेतकऱ्यांच्या प्रगतीचा हा सोहळा त्यांच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे," असे आयोजनकर्त्यांनी सांगितले.
या सोहळ्याने नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.