*होय प्रहारची सेटलमेंट आहे नेवासा तालुक्याच्या विकासाशी- ॲड. पांडुरंग औताडे*
नेवासा.महाराष्ट्राच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्राला विशेष असे महत्त्व आहे सहकार सम्राटांच्या अधिपत्याखाली राहून येथील राजकारण गडीवरून हाकण्याचे काम नेहमीच होत आलेले आहे. कोणत्याही पक्षाशी आमदार व्हायचं असेल तर यांच्या शिवाय ही गोष्ट शक्य होत नाही परंतु सद्यस्थितीत पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात प्रहारचा भिडू बच्चू कडू यांनी राजकीय नेवासा तालुक्यातील एन्ट्री अनेकांच्या काळजात धडकी भरवणारी आहे. नायक चित्रपटातील राजकारणी नेवासा तालुक्यातील अनेकांनी आदर्श मानला त्यांच्या मार्फत भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे सामान्य प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उमेदवारी देऊन अनेकांनी उमेदवारीसाठी प्रस्थापित नेत्या मार्फत प्रयत्न केले यश आले नाही बच्चुभाऊ नेहमी म्हणतात झेंडा पेक्षा अजेंडा महत्त्वाचा आहे नेवासा तालुक्यात सामान्य कुटुंबातील बाळासाहेब मुरकुटे आमदार झाले या आमदारकीच्या माध्यमातून घराघरात विकासाची स्वप्न अगदी ती विरोधी पट्ट्यात मग प्रस्थापितांच्या बालेकिल्ल्यात अनेक वर्ष राखाडलेल्या रोडचे प्रश्न असतील त्याचबरोबर विजेचा प्रश्न सर्वसामान्याला उपलब्ध होत सोडविण्याचा प्रयत्न केला आमदारकी ही जनसेवेसाठी असते हे दाखवण्याचा प्रयत्न केला यातूनच राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहिले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चुभाऊ यांनी त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी उमेदवारी दाखल केली प्रामुख्याने उबाठा गटाचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांना मशाल चिन्ह दिले त्याचबरोबर महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांना भाजप व्हाया शिंदे शिवसेना यांचे धनुष्यबाण मिळाले मूळ प्रश्न नेवासा तालुक्यातील विकासाचा दूर ठेवून राजकीय चिखल फेक सुरू करून विकासाच्या बाबतीत अजेंडा न मांडता यामध्ये काहींनी बच्चुभाऊ यांचे नाव घेऊन स्वतःकडे जनतेचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न केला त्यांना कदाचित माहिती नसेल बच्चुभाऊ काय चीज आहे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक जण त्यांच्याशी संपर्कात आले आहेत. यामध्ये भाजपाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मध्ये शेतकऱ्यांसाठी आंदोलन देखील केली त्याचबरोबर अमित शहा यांच्या विरोधात राजकीय भूमिका घेतली उद्धव ठाकरे यांच्याबरोबर देखील संघर्ष आणि सत्ता या बाबी प्रामुख्याने आल्या त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासोबत ची राजकीय मैत्री सर्वश्रुत आहे ते बच्चुभाऊ देखील मान्य करतात 2019 मध्ये आमदार शंकरराव गडाख यांनी शेतकरी क्रांतिकारी पक्ष काढला आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी शेतकरी नेते यांना हाक दिली याच हाकेला अनुसरून बच्चुभाऊ त्याचबरोबर शेतकरी नेते जयंत पाटील यांनी घोडेगाव येथे सभा घेतली यानंतर दोघेही सरकारमध्ये मंत्री होते त्याचबरोबर यानंतर स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कैवारी म्हणून त्यांचा गौरव देखील केला ही सर्व राजकीय पार्श्वभूमी असताना नेवासा तालुक्यातील लोकांना विकासाचे मुद्दे अपेक्षित असताना राजकीय कुरघोडी म्हणून अनेक जण केवळ निवडणूक दुसरीकडे नेण्यासाठी प्रहारचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांनी कामाच्या माध्यमातून जनसामान्यात स्वतःची प्रतिमा तयार केलेली असल्याने विकासाच्या मुद्द्यावर न बोलता सेटलमेंट सारखे लोकांना बरे वाटणारी पन्ना पटणारी आरोप सुरू करून निवडणूक दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न चालविला आहे म्हणून प्रहारची सेटलमेंटच आहे परंतु नेवासा तालुक्यातील झालेल्या विकासाशी म्हणून तुलना निश्चित करा परंतु विकासाबरोबर बाकी क्रमशः मांडूच तात्पुरते एवढेच.९८९०२७३६५६