ही बातमी व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी लिंक वर थोडा वेळ दाबून धरा व सिलेक्ट करून युट्युब व्हिडिओमध्ये पहा
https://youtu.be/IySyEAVbRgU?si=27LlPkXiIZ_IWWBS
नेवासा
नेवासा विधानसभा अपक्ष उमेदवार व महायुती व महाविकास आघाडीची लढत, मतांची विभागणी कशी होईल?,4 नोव्हेंबर ही 221 नेवासा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे,यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष महायुतीतील बंडखोर उमेदवारांचे निर्णय घेण्याकडे लागले आहे, भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि राष्ट्रवादीचे अब्दुल शेख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणार की निवडणूक लढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,नेवासा विधानसभेसाठी 24 उमेदवारांनी 33 अर्ज दाखल केले होते,मात्र, मुरकुटे यांचे भाजप व शिवसेनेकडून दाखल केलेले अर्ज एबी फार्मच्या अभावी बाद झाले,आता शिल्लक असलेल्या 31 उमेदवारांमध्ये प्रमुख आहेत,शंकरराव यशवंतराव गडाख (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे),विठ्ठलराव वकिलराव लंघे (शिवसेना), ऋषिकेश वसंत शेटे अपक्ष,बाळासाहेब दामोधर मुरकुटे (प्रहार जनशक्ती),
अब्दुल शेख (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),
पोपट रामभाऊ सरोदे (वंचित बहुजन आघाडी),
शशिकांत भागवत मतकर (राष्ट्रीय समाज पक्ष),
हरिभाऊ बहिरु चक्रनारायण (बहुजन समाज पार्टी),संतोष नानासाहेब काळे (अपक्ष),ऋषिकेश वसंत शेटे (अपक्ष),काबंळे ज्ञानदेव लक्ष्मण (अपक्ष)
मुकुंद (अपक्ष),अजित बबनराव काळे (अपक्ष)
तुक्काराम अभंग (अपक्ष),ज्ञानदेव कारभारी पाडळे (अपक्ष),वसंत पुंजाहारी कांगुणे (अपक्ष),जगन्नाथ माधव कोरडे (अपक्ष)सचिन प्रभाकर दरंदले (अपक्ष),सचिन मदनलाल देसरडा (अपक्ष),रविराज तुक्काराम गडाख (अपक्ष),गोरक्षनाथ पंढरीनाथ कापसे (अपक्ष),रामदास रावसाहेब चव्हाण (अपक्ष),शरद बाबुराव माघाडे (अपक्ष)सुनिता शंकरराव गडाख (अपक्ष),आशाताई दादासाहेब मुरकुटे (अपक्ष),रत्नमाला विठठलराव लंघे (अपक्ष)
महायुतीतील पेच वाढला आहे, कारण मुरकुटे यांनी प्रहार जनशक्ती पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, आणि निवडणूक लढण्यावर ठाम आहेत, शेख यांनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्याचा दावा केला आहे, यामुळे महायुतीतील उमेदवारांची लढत अधिक जटिल होण्याची शक्यता आहे,जर मुरकुटे व शेख यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास, नेवासा तालुक्यात शंकरराव गडाख, विठ्ठलराव लंघे, बाळासाहेब मुरकुटे आणि अब्दुल शेख यांच्यात चौरंगी लढत होऊ शकते,यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अपक्ष उमेदवार ऋषिकेश शेटे यांना थोडा फायदा होऊ शकतो,सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत केवळ पाच तासात अर्ज माघारी घेता येणार आहे, या प्रक्रियेत कोणत्याही उमेदवाराच्या मनधनेची अपेक्षा आहे,जर महायुतीतील बंडखोर उमेदवारांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, तर मतांची विभागणी अधिक जटिल होईल,उद्या निर्णयाची तात्काळ अपेक्षा असून, नेवासा तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक तणावपूर्ण बनले आहे. मतदारांनी कोणाची निवड करायची आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.