बातमी व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/-qVQtOpYpGU?si=C5zzT0AX7kVION8B
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
*नेवासा विधानसभा निवडणूक माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे लढविणार यांचा ठाम निर्णय*💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
नेवासा विधानसभा निवडणूक: माजी आमदार बाळासाहेब पाटील मुरकुटे यांचा ठाम निर्धार, माजी आमदार बाळासाहेब पाटील मुरकुटे आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे युवा नेते विष्णू मुरकुटे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यांनी तालुक्यातील विरोधकांकडून सोशल मीडियावर पसरविलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले,"आपण अपक्ष व प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने लढणार आहोत," असे मुरकुटे यांनी सांगितले. तालुक्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नांना तोंड देत, बाळासाहेब पाटील मुरकुटे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले,नेवासा विधानसभा निवडणूक ही एक महत्त्वाची घटना असून, पाटील यांचा अनुभव आणि जनसंपर्क यामुळे या निवडणुकीत त्यांना मजबूत प्रतिस्पर्धा देण्यास सज्ज असलेल्या विरोधकांसमोर आव्हान असणार आहे.