नेवाशात जॉईंट किलर ठरणार... ऋषिकेश शेटे ! local Newsa


नेवाशात जॉईंट किलर ठरणार... ऋषिकेश शेटे !

चौकट 
नेवासा तालुक्यात प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य शेतकरी पुत्र अशी लढत होण्याची दाट शक्यता

नेवासा प्रतिनिधी 
सध्या नेवासा तालुक्यात विधानसभेचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीकडून नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याचे स्पष्ट संकेत वरिष्ठ पक्षश्रेष्ठीकडून मिळाले असल्याने तालुक्यात नवीन चेहरा म्हणून युवा नेते ऋषिकेश शेटे यांचे नाव आघाडीवर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब  व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे निकटवर्तीय असल्यामुळे नवीन चेहऱ्यामधे शेटे यांचे नाव अग्रक्रमावर आहे असे बोलले जात आहे. तालुक्यातील ऊस तोडणी प्रश्न असो वा कारखाना कामगार पेमेंट किंवा शेतकऱ्याचे उसाचे पेमेंट किंवा शासकीय कार्यालयात गोरगरीब जनतेची अडवणूक , शनेश्वर देवस्थान घोटाळा, व प्रस्थापितांचे तालुक्यातील इतर गैरव्यवहार व घोटाळे असे अनेक प्रश्न जनतेसमोर आणून त्या प्रश्नावर थेट विधानसभेत लक्षवेधी पर्यंत प्रवास करून प्रश्न निकाली काढण्याची हातोटी व थेट पक्षश्रेष्ठींकडे संपर्क असल्यामुळे सध्या तालुक्यात तरुण तडफदार युवा व सर्वात जास्त जनसंपर्कातील नाव म्हणून ऋषिकेश शेटे यांचं नाव नवीन चेहरा म्हणून आघाडीवर आहे. हा चेहरा दिला तर तालुक्यातील पक्षांतर्गत मतभेद दूर होऊन सर्वजण एकत्रित काम करू शकतात असेही मुख्य पदाधिकाऱ्याकडून बोलले जात आहे. शिवाय आमदार होण्यासाठी लागणारी गुप्त यंत्रणा व गुप्त आशीर्वाद ऋषिकेश शेटे यांच्यासोबत असल्याचे बोलले जात आहे. कुठलेही पद नसताना देखील हाती धरलेला प्रश्न व पक्षाच्या वरीष्ठांकडुन दखल घेत विधान सभेत थेट पाच ते सहा लक्षवेधी मांडल्या गेल्या. याचे श्रेय नेवासा तालुक्यातील युवा कार्यकर्ता म्हणून ऋषिकेश शेटे यांचे नाव आहे. त्याचबरोबर 365 दिवस 24 तास उपलब्ध असणारा तालुक्यातील हा कार्यकर्ता कोरोनाच्या काळात असो किंवा मुख्यमंत्री सहायता निधी मदत, केंद्राच्या व राज्याच्या योजना थेट गरिबांपर्यंत पोहोचवण्याच काम कायमस्वरूपी करत आहे. ऊस तोडणीचे मोठे आंदोलन उभे करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शनेश्वर देवस्थान मध्ये होत असलेल्या घोटाळे आणि गैरकारभाराबाबत उपोषण करून वरिष्ठांपर्यंत हा विषय मांडण्यात त्यांना यश आले आहे. तालुक्यातील दांडगा जनसंपर्क पाहता व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस यांचे निकटवर्ती असल्यामुळे ऋषिकेश शेटे यांनाच उमेदवारी मिळनार असल्याचे खात्रीदायक वृत्त हाती येत आहे. कार्यकर्त्यामागे खंबीरपणे उभे राहून कार्यकर्त्याला बळ देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये मोठी फळी यांनी काही दिवसात तालुक्यात निर्माण केली आहे. त्याचबरोबर शेटे यांनी नेतृत्व केल्यास नेवासा तालुक्यातील असंख्य युवकांचे प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतील अशी निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्त्यां कडून सांगण्यात येत आहे. नेवासा तालुक्यात प्रस्थापित विरुद्ध विस्थापित शेतकरी अशी लढत लवकरच पाहायला मिळणार आहे. तालुक्यात असलेला दांडगा जनसंपर्क व कार्यकर्त्यांची मोठी फौज यांच्या जोरावर युवा नेते ऋषिकेश शेटे नेवासा तालुक्यात विजयश्री खेचून आणतील अशी सुज्ञ नागरिकांमध्ये चर्चा आहे. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत व मुख्यमंत्री सहायता निधी मधून असंख्य लोकांना करोडो रुपये गोरगरीब रुग्णांनाऔषध उपचारासाठी मिळून देण्यात शेटे यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे नेवासात अशी लढत होण्याची दाट शक्यता सध्या  दिसून येत आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.