*गुड न्यूज; लाडकी बहीण याेजनेचे पैसे २९ सप्टेंबरला खात्यात जमा हाेणार*
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता रविवार (ता २९) महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. नगर जिल्ह्यातील ११ लाख ५२ हजार ४५६ महिलांचे अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत.
लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या २९ सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे त्या दिवशी महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जिल्ह्यातील ८ लाख २४ हजार ७२० महिलांना २४७ कोटी ४१ लाख ६० हजार रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आला आहे. उर्वरित पात्र महिलांना जुलै २०२४ पासून दरमहा रुपये १५०० प्रमाणे तीन महिन्यांचा लाभ देण्यात येणार आहे.