नेवासा विधानसभेची जागा काँग्रेसला सोडा - संभाजी माळवदे*

*नेवासा विधानसभेची जागा काँग्रेसला सोडा - संभाजी माळवदे*

*काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली मागणी*


(नेवासा प्रतिनिधी) - महाविकास आघाडीकडून नेवासा विधानसभेची जागा ही काँग्रेस पक्षाला सोडा अशी आग्रहाची मागणी नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष  संभाजी माळवदे यांनी काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली. तर तुम्हीं मनात कुठलीही शंका न ठेवता जोरात तयारी सुरू ठेवा असे नाना पटोले यांनी स्पष्ट मत मांडले.
         विधानसभा निवडणुकी तोंडावर आल्या आहेत यामुळे प्रत्येक पक्षातील पदाधिकारी उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. यात काँग्रेस पक्ष देखील आघाडीवर आहे.गेल्या पंधरा वर्षांपासून नेवासा काँग्रेस पक्षात सक्रिय काम करणारे,  विद्यार्थी काँग्रेस, युवक काँग्रेस, ते सहा वर्ष काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदावर राहिलेले संभाजी माळवदे यांनी देखील काँग्रेस पक्षास नेवासा तालुक्यातील जागा मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आग्रहाची मागणी केली तसेच काँग्रेसला ही जागा मिळाली तर निश्चितपणे या जागेवर  उमेदवार निवडून येईल असेही ठामपणे सांगितले. तसेच माळवदे स्वतः  काँग्रेस पक्षाकडून ही जागा लढवू इच्छीत आहे हे देखील स्पष्टं मत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुढें मांडले. गेल्या दहा वर्षापासून माळवदे यांनी नेवासा तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आहेत तसेच तालुक्यांतील जनसामान्यांच्या प्रश्नासाठी ते सोडविण्यासाठी लढा दिला आहे.तालुक्यात काँग्रेसच्या माध्यमातुन कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केलें आहे. निम्म्याहून अधिक गावात काँग्रेसच्या शाखा स्थापन केलेल्या आहेत. प्रश्न कोणाचाही कोणत्याही गावातील असो, कोणत्याही कार्यालयाशी निगडीत असो माळवदे यांनी सवेंदनशिलपणे हाताळले आहेत.वेळप्रसंगी मैदानात उतरून आंदोलने करुन ते मार्गी लावले आहेत. नेवासा तालुक्यातील तहसील कार्यालय,नगरपंचायत , पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय  याठिकाणी होणाऱ्या भ्रष्ट्राचार विरोधात नेहमीच आवाज उचलला आहे. न होणारी कामे मार्गी लावण्याचे काम माळवदे यांनी केलें आहे.
भ्रष्टाचारा विरोधात लढणारा कार्यकर्ता अशी ओळखच निर्माण झाली आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना तालुक्यातील  राजकारणात माळवदे यांनी आपला ठसा उमटविला आहे. नुकतेच प्रत्येक गावात फिरुन समाजाचे प्रश्न समजुन घेण्यासाठी माळवदे यांनी लोकन्याय यात्रा देखील काढली होती. यात गावातली रस्ते, घरकुल, डोल, कुपण असे प्रश्न सोडविण्यासाठी मार्गी लावण्यासाठी माळवदे यांनी लढा दिला. माळवदे यांच्या रुपाने महाविकास आघाडीस उमेदवार मिळाला तर एक जनतेच्या प्रश्नासाठी सर्वसामान्याच्या हक्कासाठी  लढणारा उमेदवार लाभणार आहे जो जनतेचे प्रश्न सोडवू शकतो. जर आगामी विधानसभा निवडणुकीत माळवदे रिंगणात उतरल्यानंतर कशा पद्धतीची लढत पाहायला मिळते ही उत्सुकता तालुक्यांतील जनतेला बघण्यास मिळेल.
*चौकट* -  नेवासा विधानसभेची जागा महाविकास आघाडीने  काँग्रेसला सोडल्यास याठीकाणी निश्चितच काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल व काँग्रेसचा पारंपारिक मतदार संघ हा पक्षाच्या ताब्यात येईल.काँग्रेसकडून मला जोरात तयारी करा असे स्पष्ट निर्देश दिलेले आहे त्यामुळे येत्या काळात तालुका दौरा करून प्रचार करणारं. संभाजी माळवदे- मा.अध्यक्ष काँग्रेस कमिटी नेवासा

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.