*अब्दुल भैय्या शेख यांच्या जनता दरबार हजारो लोकांचे प्रश्न मार्गी नेवासा तालुक्यातील मतदार राष्ट्रवादी सोबत येत आहे*
नेवासा : (प्रतिनिधी गणेश चौगुले)पाच ऑक्टोबर रोजी नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे श्रद्धा लॉन्स मध्ये राष्ट्रवादी चे नेते नेवासा विधानसभा सदस्य अब्दुल भैय्या शेख यांच्या जनता दरबार मध्ये हजारो लोकांचे प्रश्न मार्गी. पिठाची गिरणी वाल्या भाभी चा लेक ते नेवासा तालुक्यातील जनतेचा हृदयातील नेवासा विधानसभेचे उमेदवार अब्दुल भैय्या लोकांच्या विश्वासास पात्र. त्यांच्या लोकहित कार्यक्रम च्या निमित्ताने सर्व जाती धर्मातील लोक विविध प्रश्न घेऊन त्यांच्याकडे येत आहे.
बांधकाम मजूर यांचे सुमारे दहा हजार लोकांचे संघटन त्यांनी नेवासा तालुक्यात उभे केले आहे. हजारो लोकांचे रेशन कार्ड प्रश्न त्यांनी मार्गी लावला. बचत गटाच्या महिलांना विविध लाभ ते मिळवून देत आहे. लडकी बहीण योजना नेवासा तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्तीवर दिन दलित झोपडीतील महिला भगिनी यांच्या पर्यंत लाभ मिळवून देत आहे. तरुणांना रोजगार मार्गदर्शन मेळावे घेऊन ते राज्यभर चर्चेत आहे. नेवासा तालुक्यातील लोकांना आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड नाव कमी करणे, रेशन कार्ड मध्ये नवीन नाव समाविष्ट करणे, रेशन धान्य लाभ मिळवण्यासाठी ग्रामपंचायत ला संपर्क साधून ठराव देण्यासाठी सूचना करणे, रेशन कार्ड मध्ये नाव ऑनलाईन करुन देणे, शासन आणि प्रशासन मधील महत्वाचा दुवा म्हणून ते कार्य करीत आहे. मुलींसाठी विविध रोजगार संधी ओळखून फॅशन डिझाईन कोर्स कार्यशाळा, मेकअप करिता कार्यशाळा घेऊन, तरुणांना रोजगाराचे मार्गदर्शन, ज्येष्ठ मंडळी यांना तीर्थ यात्रा लाभ मिळवून देत आहे. निराधार महिलांना आधार देण्यासाठी शासकीय योजणांचा लाभ मिळवून देत आहे.
*राष्ट्रवादी चे अब्दुल भैय्या शेख यांचे संकल्पनेतून जनता दरबार श्रद्धा लॉन्स कुकाणा येथे संपन्न*
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे नामदार अजित दादा पवार समर्थक अब्दुल भैय्या शेख यांचे वतीने जनता दरबार भरला. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी, प्रलंबित असलेले विषय मार्गी लावण्याकरिता कागदपत्रे दुरुस्ती, आधार कार्ड दुरुस्ती, नवीन मतदार नोंदणी, रेशन कार्ड ऑनलाईन करणे, रेशन कार्ड मधील दुरुस्ती, विजेच्या संधर्भातील प्रश्न, यांच्याबरोबर मोतीलाल ओसवाल प्रायव्हेट फायनान्स कढून होणारा त्रास तसेच त्यांची मनमानी कारभाराच्या विरोधात थकीत कर्ज व नियमित कर्ज वाल्याना न मिळणारे कागदपत्र व होणारा त्रास, पी. एम. किसान योजना, चोरांचा सुळसुळाट, बेकायदेशीर त्रासदायक ठरणाऱ्या प्रश्नवार वाचा फोडण्याकरिता जनता दरबार चे आयोजन...
सर्व जाती धर्मातील लोक सोबत घेऊन कुणाला विरोध न करता कुणाची रेषा छोटी न करता आपल्या कामाचं आलेख वाढवत असून त्यांची रेषा नेवासा तालुक्यात फार मोठी झाली आहे. आजी माजी आमदार एक मेकांवर आरोप करण्यात आणि एक दुसऱ्यांच्या कार्यकर्त्यांची जिरवा जिरवी करीत असताना कार्यकर्त्यांची मोठी फौज निर्माण करुन लोकांच्या विश्वास अब्दुल भैय्या जिंकला आहे. नेवासा तालुक्यातील जाती भेद दुही करणारे यांना दूर सारून विकासाच्या मुद्ध्यावर विचारांची लढाई विकासाचे पर्व उभे करण्याचे काम हा तरुण करीत आहे. लोकांभिमूख भुमिका घेऊन ते वाटचाल करीत आहे