बहुजन समाज पार्टी विधानसभेची उमेदवारी वंचित चे माजी तालुकाध्यक्ष मा. हरिभाऊ चक्रणारायन यांना जाहीर


नेवासा:- बहुजन समाज पार्टी विधानसभेची उमेदवारी वंचित चे माजी तालुकाध्यक्ष मा. हरिभाऊ चक्रणारायन यांना जाहीर 
नेवासा विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर नेवासा तालुक्यातील अनेक उमेदवारांनी बहुजन समाज पार्टी कडे उमेदवारी अर्ज मागितले होते. पण बसपाच्या वरिष्ठ नेत्यांनी नेवासा तालुक्यातील बहुजन समाजाशी नाळ असलेले नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे व सर्व जाती धर्माच्या लोकांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे वंचित चे माजी तालुकाध्यक्ष मा. हरिभाऊ चक्रणारायन यांना घोषित बहुजन समाज पार्टी चे महाराष्ट्रात प्रभारी खासदार डॉ अशोक शिध्दार्थ महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष सुनिल डोंगरे , प्रदेश कमिटीचे सदस्य रामचंद्र जाधव, जिल्हा अध्यक्ष उमाशंकर यादव , जिल्हा प्रभारी राजु खरात सुनिल ओव्हाळ , जिल्हा उपाध्यक्ष विकास चव्हाण इत्यादी मुंबई येथील बहुजन समाज पार्टीच्या कार्यालयांमध्ये बसपा चे उमेदवार हरिभाऊ चक्रणारायन बसपा मध्ये प्रवेश करुन उमेदवारी घोषित करण्यात आली तसेच पक्षाचा AB फॉर्म देण्यात आला.
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असल्या कारणाने नेवासा तालुक्यातील बहुजन समाज पार्टी विधानसभेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला या वेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास चव्हाण , सुनिल घोरपडे, किरण शिरसाट, सविता कांबळे, विकीभाऊ बनकर,योगेशभाऊ बोर्डे,पा. दिलीप सोनवणे, ज्ञानेश्वरभाऊ साठे, अविनाशभाऊ चक्रनारायण,नितीन भाऊ वाघमारे,सतीशभाऊ खर्चन, किरणभाऊ चकनारायण,मनोजदादा चक्रनारायण, चंदूभाऊ चकनारायण,संतोषभाऊ धनवटे, दिपकभाऊ धनवटे,दिनेशभाऊ धनवटे,सि.प्रियंकाताई हरिभाऊ चक्रनारायण, इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.