नेवासा:- बहुजन समाज पार्टी विधानसभेची उमेदवारी वंचित चे माजी तालुकाध्यक्ष मा. हरिभाऊ चक्रणारायन यांना जाहीर.
नेवासा विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर नेवासा तालुक्यातील अनेक उमेदवारांनी बहुजन समाज पार्टी कडे उमेदवारी अर्ज मागितले होते. पण बसपाच्या वरिष्ठ नेत्यांनी नेवासा तालुक्यातील बहुजन समाजाशी नाळ असलेले नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे व सर्व जाती धर्माच्या लोकांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे वंचित चे माजी तालुकाध्यक्ष मा. हरिभाऊ चक्रणारायन यांना घोषित करण्यात आली आहे.
बहुजन समाज पार्टी चे महाराष्ट्रात प्रभारी खासदार डॉ अशोक शिध्दार्थ,महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष सुनिल डोंगरे , प्रदेश कमिटीचे सदस्य रामचंद्र जाधव, जिल्हा अध्यक्ष उमाशंकर यादव,जिल्हा प्रभारी राजु खरात, सुनिल ओव्हाळ , जिल्हा उपाध्यक्ष विकास चव्हाण इत्यादी मुंबई येथील बहुजन समाज पार्टीच्या कार्यालयांमध्ये बसपा चे उमेदवार हरिभाऊ चक्रणारायन बसपा मध्ये प्रवेश करुन उमेदवारी घोषित करण्यात आली .तसेच पक्षाचा AB फॉर्म देण्यात आला.
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असल्या कारणाने नेवासा तालुक्यातील बहुजन समाज पार्टी विधानसभेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला या वेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास चव्हाण , सुनिल घोरपडे, किरण शिरसाट, सविता कांबळे, विकीभाऊ बनकर,योगेशभाऊ बोर्डे,पा. दिलीप सोनवणे, ज्ञानेश्वरभाऊ साठे, अविनाशभाऊ चक्रनारायण,नितीन भाऊ वाघमारे,सतीशभाऊ खर्चन, किरणभाऊ चकनारायण,मनोजदादा चक्रनारायण, चंदूभाऊ चकनारायण,संतोषभाऊ धनवटे, दिपकभाऊ धनवटे,दिनेशभाऊ धनवटे,सि.प्रियंकाताई हरिभाऊ चक्रनारायण, इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेवासा विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असून नेवासा विधानसभा २२१ मध्ये प्रामुख्याने निवडणुकीत निवडणूक लढविण्यार्या उमेदवारांपैकी राष्ट्रीय पक्षातर्फे हरिभाऊ चक्रणारायन बसपा च्या वतीने निवडणूक रिंगणात आहेत.
नेवासा विधानसभेत हत्तीची चाल रफतार पकडणार असुन बसापा चे उमेदवार हरिभाऊ चक्रणारायन यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे.आपल्याच उमेदवार्याला कसे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवता येईल असी रणनीती कार्यकर्ते आखणी करण्यात व्यस्त आहेत. हरिभाऊ चकनारायण यांचे नेवासा तालुक्यामध्ये "गरिबो का दाता"अशी ओळख आहे.अन्याय-आत्याचाराविरुद्ध उभे राहणे, गोरगरिबांना न्याय देण्यासाठी 24 घंटे उपलब्ध राहणे, अर्ध्या रात्री जनतेसाठी धावून जाणे ही त्यांची ओळख आहे. राष्ट्रीय पक्ष बसपा तर्फे हरिभाऊ चकनारायण यांची उमेदवारी असल्याने नेवासा तालुक्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून प्रत्येक कार्यकर्ता स्वतःची जबाबदारी म्हणून कामाला लागलेला आहे.