*सुरेश शेटे पाटील यांचा महाराष्ट्र स्वराज पक्षात प्रवेश*
*नेवासा विधानसभेसाठी महाराष्ट्र स्वराज पक्षाकडून उमेदवारी जाहीर*
(नेवासा प्रतिनिधी) :- नेवासा तालुक्याचे भूमिपुत्र जय शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील शेटे यांनी आज पुणे येथील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या मुख्यालयात छ्त्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र स्वराज पक्षात प्रवेश केला. यावेळी छ्त्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्र स्वराज पक्षात स्वागत करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या, व स्वराज्य पक्षाकडून नेवासा विधानसभेची उमेदवारी जाहीर केली.
नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील रहिवासी प्रसिद्ध उद्योगपती लीलियम पार्क समूहाचे मालक, तसेच सामांजिक कार्यकर्ते सुरेश पाटील शेटे यांनी आज महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केला. गेल्या वीस वर्षांपासून शेटे यांनी शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून समाजकार्य केले आहे तर मराठा समाजासाठी व आरक्षणसाठी शेटे यांनी लढा दिला आहे. नेवासा तालुक्यातील जनतेच्या प्रश्नासाठी देखील शेटे यांनी मोठा लढा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नेवासा विधानसभेसाठी देखील जोरात तयारी शेटे यांनी सूरु केली होती. यासाठी लोकशक्ती आघाडीची स्थापना करतं लोकण्याय यात्रेच्या माध्यमातून शेटे यांनी तालुक्यातील प्रत्येक गावाचा दौरा करून जनतेच्या समस्या समजून घेतल्या व त्या सोडविल्या देखील त्यामुळे नेवासा तालुक्यात सर्वसामान्य जनतेमधील नेता अशी ओळख शेटे पाटील यांची निर्माण झाली आहे. त्यामुळे नेवासा तालुक्यात महाविकास आघाडी व महायुती यांच्यामधे आता स्वराज्य पक्षाचे उमेदवार सुरेश पाटील शेटे यांचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. येत्या काही दिवसांत तालुक्यातील जनतेला मोठी तिरंगी लढत बघण्यास मिळणार आहे. याची उत्सुकता देखील जनतेला आहे. या प्रवेशावेळी शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी तसेच नेवासा तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.