नेवासा विधानसभेसाठी काँग्रेसकडून संभाजी माळवदे ?
(नेवासा प्रतिनिधी) - मुंबई येथे महाविकास आघाडीच्या चाललेल्या मॅरेथॉन बैठका व सीट वाटपात चाललेली रस्सीखेच तसेच शिवसेना व काँग्रेस पक्ष यांच्यात सीट वाटपासाठी झालेला वाद यावरून कालपासून महाराष्ट्रात काँग्रेस व शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढन्याच्या मंनस्थितीत असल्याच्या बातम्या, यावरून असे स्पष्ट दिसून येत आहे की आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे याचं पार्श्वभूमीवर नेवासा विधानसभेसाठी काँग्रेसकडून संभाजी माळवदे यांच्याकडून उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे तर आघाडी जर तुटली तर काँग्रेसकडून संभाजी माळवदे यांना उमेदवारी निश्र्चित देण्यात येईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.तालुक्यात भ्रष्टाचार विरोधात लढा देणारा नेता, लोकांच्या प्रश्नांसाठी ते प्रश्न सोडविण्यासाठी मैदानात लढा देणारा नेता अशी ओळख असणारा नेता तालुक्यातील जनतेला न्याय्य देईल, तालुक्याचा कायापालट करेल हे निश्र्चित. फक्तं आज होणाऱ्या आघाडीच्या बैठकीत काय निर्णय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लवकरच तालुक्यातील उमेदवाराचे नाव देखील निश्र्चित होईल. कोण तालुक्यात लढा देईल याकडे जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे.