मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही आलो की सर्व योजना बंद करणार. जेलमध्ये टाकणार. पोलखोल करणार, असं विरोधक म्हणत आहेत. पण कोणाला जेलमध्ये टाकणार? योजना बंद करणार? तुमची पोलखोल झाली आहे. कोविडमध्येच तुमची पोलखोल झाली. काहीजण तर जेलमध्येही गेले. या सर्व योजना बंद करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.ते पुढे म्हणाले की, विरोधक आता खुलेआम बोलायला लागले आहेत. एवढी इर्ष्या? लोक विरोधात जातील. लाडकी बहीण योजनेला टच करायला गेलात तर त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा. एकदम करेक्ट कार्यक्रम होणार. आमच्या लाडक्या बहिणी अजिबात ऐकून घेणार नाहीत. आम्ही ठरवलं आहे की लखपती बहिणी बनवणार. माझ्या बहिणींचं काय आहे ते बघा, माझं काय माझं काय बघून उद्योजक पळून गेले. म्हणून ठरवलं आहे सर्वसामान्य माणसाला काय देणार. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस येणार. म्हणून आम्ही काम करतोय”, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.