*भिमशक्ती सामाजिक संघटना भानस हिवरा यांच्या वतीने शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या संजय वाघमारे यांचा सत्कार*
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका पुनतगाव येथील शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक संजय वाघमारे यांना नुकताच गोवा सरकारचा महात्मा गांधी मानव सेवा नॅशनल अवॉर्ड गोवा राज्याचे विधानसभा अध्यक्ष माननीय रमेशजी तवडकर साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. भानस हिवरा तालुका नेवासा भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्यावतीने संजय वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी नेवासा तालुका उपाध्यक्ष अरिफ शेख भानस हिवरा शहर अध्यक्ष राहुल वंजारे उपाध्यक्ष सिकंदर भाई शेख युवा अध्यक्ष शाकीर भाई आत्तार, कार्यकारी अध्यक्ष चांगदेव दारुंटे संघटक अमोल भाऊ साळवे,सचिव असलम सय्यद,सह सचिव आंद्रेस मकासरे, बाळासाहेब शेंडे, भानुदास काळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.