नेवासे तालुक्यातील तामसवाडी वाटापुर निपाणी निमगाव रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करणे तसेच झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी साठी उपोषण

नेवासा (प्रतिनिधी सचिन मंचरे)
तालुक्यातील तामसवाडी वाटापुर निपाणी निमगाव रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करणे तसेच झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी होऊन संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कामाचे दिरंगाईबाबत चौकशी होऊन फौजदारी गुन्हे दाखल होने करता सारंग फोपसे व संजय कोलते यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग नेवासा यांच्याकडे दिनांक 3/ 9/ 2024 रोजी निवेदन उपोषणाचा इशारा दिला होता त्याची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने आज रोजी १३/९/२४ शुक्रवार तामसवाडी ग्रामस्थांनी गावातील हनुमान मंदिरासमोर छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आमरण उपोषणास प्रारंभ केलेला आहे यावेळेस संजय कोलते यांनी सांगितले की प्रत्यक्ष कारवाई झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही यावेळी गावातील ग्रामस्थ व वाटापुर येथील ग्रामस्थ गोमळवाडी येथील ग्रामस्थ खरवंडी येथील ग्रामस्थ निपाणी निमगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते* 

शोसल मिडीयावरील पोस्ट
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.