गजानन कॉलनी, ता. श्रीगोंदा येथुन महाराष्ट्र राज्यात विक्रीस व वाहतुकीस प्रतिबंधीतअसलेला ६,१६,२०४/- रुपये किंमतीचा पानमसाला व गुटखा जप्त,


गजानन कॉलनी, ता. श्रीगोंदा येथुन महाराष्ट्र राज्यात विक्रीस व वाहतुकीस प्रतिबंधीत
असलेला ६,१६,२०४/- रुपये किंमतीचा पानमसाला व गुटखा जप्त,
१ आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई.
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि / श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे
शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवून कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेशित केले आहे.
नमुद आदेशान्वये पोनि / श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि समाधान भाटेवाल, पोहेकॉ /
ज्ञानेश्वर शिंदे, पोकों/ आकाश काळे, जालिंदर माने, मयुर गायकवाड व बाळासाहेब गुंजाळ अशांचे पथक नेमुन अवैध
धंद्यांची माहिती घेवून कारवाई करणे बाबत सुचना देवून पथकास रवाना केले.
पथक दिनांक १३/०८/२४ रोजी अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत इसम नामे
रवी दळवी हा वडळी रोड, गजानन कॉलनी, ता. श्रीगोंदा हा करमाळा, जिल्हा सोलापुर येथील १) पांडु ऊर्फ शकील
तांबोळी व २) शोएब शकील तांबोळी यांच्याकडुन महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत व शरीरास अपायकारक होईल
असा विविध कंपनीचा पानमसाला व गुटख्याची खरेदी करुन वडळी रोड, गजानन कॉलनी, ता. श्रीगोंदा येथे पत्र्याचे
गोडाऊनमध्ये साठा करुन विक्रीच्या उद्देशाने सुमो गाडीतुन अवैध वाहतुक करतो आता गेल्यास मिळुन येईल अशी
खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी वडळी रोड, गजानन कॉलनी, ता. श्रीगोंदा येथे
जावून खात्री केली असता पत्र्याचे शेडमध्ये १ इसम बसलेला दिसला, त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव
गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १) रवी बबन दळवी वय ३९, रा. रोकडोबा चौक, ता. श्रीगोंदा असे सांगितले.
त्याचे गोडाऊन मधील मालाबाबत विचारपुस करता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने पंचा समक्ष त्याचे
गोडाऊनची झडती घेता, सदर गोडाऊनमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस व वाहतुकीस प्रतिबंधीत तसेच शरीरास अपायकारक
असलेला विविध प्रकारचा पानमसाला व गुटखा मिळुन आल्याने त्यास सदर पानमसाला व गुटखा कोणाचा आहे व तो
कोठुन आणला या बाबत विचारपुस करता आरोपी रवी दळवी याने सदरचा माल त्याचा स्वतःचा आहे व १) पांडु ऊर्फ
शकील तांबोळी (फरार) व २) शोएब शकील तांबोळी (फरार) दोन्ही रा. करमाळा, जिल्हा सोलापुर याचेकडुन विक्रीस
आणल्याचे सांगितल्याने. आरोपीस १,३०,६८०/- रुपये किंमतीचा विमल पानमसाला, १६.२००/- रुपये किंमतीचा
आरएमडी तंबाखु, ३६,०००/- रुपये किंमतीची आरएमडी सुपारी, १८,९०९/- रुपये किंमतीची विमल व्ही वन तंबाखु,
६,०००/- रुपये किमतीचा हिरा पानमसाला व ४,००,०००/- रुपये किंमतीची टाटा सुमो गाडी असा एकुण ६,१६,२०४/-
रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन श्रीगोंदा पो.स्टे. गु.र.नं. ७५९/२०२४ भान्यासक १२३, २२३, २७४, २७५, ३
(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कारवाई श्रीगोंदा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब,
अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व मा. श्री. विवेकानंद वाखारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत
विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.