बहुजन मुक्ति पार्टी चे ई पिक पहाणी होत नाही त्यामळे तहसिलदार यांना निवेदन

नेवासा
बहुजन मुक्ति पार्टी नेवासा च्या वतिने मंगळवार दिनांक 13/8/2024 रोजी नेवासा तहसिलदार यांना  देण्यात आले निवेदन   ई पिक पहाणी न झालेल्या सर्वच शेतकर्यांना हेक्टरी 5000रू प्रमाणे सन2023-2024चे अनुदान द्यावेत
या संदर्भात नायब तहसीलदार चांगदेव बोरूडे साहेब यांना नेवासा तालुक्यातील बहुसंख्यक शेतकरी यानी निवेदन दिले 
   ई पिक पहाणी करताना शेतकर्यांना अनेक अडचणी येतात एकतर सर्वर मिळत नाही मिळाले तर फोर्वड होत नाही काही शेतकर्यांनाअनरोइड मोबाईल नाही छोट्या मोबाईल वर ई पिक पहाणी होत नाही त्यामळे ते वंचीत राहीले आहेत आणि ज्यांची ई पिक पहाणी झाली आहे परंतु शासनाने काढलेल्या यादीत अनेक शेतकर्यांचे नावें वगळली आहेत त्याच प्रमाणे हे सर्व शेतकरी 1रूपाया भरून विमा काढलेले असून त्यांना लाभ मिळालेला नाही विम्यापासुन देखील हे शेतकरी वंचीत राहीलेले आहेत त्यांना हे दोन ही लाभ मिळालेले नाही तरी तलाठी स्तरावर सन 2023-2024ची पिक पहाणी नुसार संबधीत शेतकर्यांना पिक वर्गवारी नुसार हेक्टरी 5000रूपये सरसकट द्यान्यात यावेत आणि सर्वांना समान न्याय मिळून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावा 
आसे निवेदन देण्यात आले 
या वेळी बहुजन मुक्ति पार्टी चे गणपतराव मोरे मक्तापुर गावचे माजी सरपंच पुनमचंदजी साळवे भाऊसाहेब सावंत राम मगरे गोर्वधन कोरडे श्रीराम मते भाऊसाहेब विधाटे सातव एकनाथ शिवाजी मते सर्जेराव काळे भावराव शिरसाठ सोपान आगळे संदिप कुसाळकर इत्यादी शेतकरी उपस्थित होते
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.