एसटीलाही जीपीआरएस बसवा आम आदमी पार्टीचे नेवासा तालुका अध्यक्ष अँड सादिक शिलेदार


एसटीलाही जीपीआरएस बसवा आम आदमी पार्टीचे नेवासा तालुका अध्यक्ष अँड सादिक शिलेदार 

नेवासा : प्रतिनिधी रेल्वेच्या धर्तीवर बसला जीपीआरएस
बसवावे व प्रवाशांना आपले लोकेशन लक्षात येण्यासाठी जी पी आर एस बसवावा अशी मागणी आम आदमी पार्टीचे नेवासा तालुका अध्यक्ष अँड सादिक शिलेदार यांनी केली आहे
गोरगरिबांचे वाहन म्हणून प्रसिद्ध असलेले परिवहन महामंडळाची बसने सध्या कात टाकली असून राज्य शासनाने महिलांसाठी ५० टक्के आरक्षण दिल्यामुळे बसला पूर्वीपेक्षा
चांगले दिवस आलेले आहेत अनेकांनी परिवहन महामंडळाच्या बसला पूर्वीपेक्षा आता जास्त प्राधान्य दिले आहे
हीच लोकप्रियता टिकून ठेवण्यासाठी परिवहन महामंडळाने एसटी बसला प्रवाशांच्या सोयीसाठी लोकेशन लक्षात येण्यासाठी प बसवावा तसेच रेल्वेच्या धरतीवर जीपीआरएस
बसवावे आणि बस स्थानकामध्ये बस वेळापत्रक दर्शवणारी डिजिटल फलक लावावेत जेणेकरून बसस्थानक डिजिटल स्वरूपात आकर्षक दिसेल बस प्रवासांसाठी अध्यावत सुविधा निर्माण केल्यास परिवहन महामंडळाची ही आर्थिक बाजू सुधारेल जेणेकरून प्रवाशांची ही वाढ होईल त्यासाठी बस स्थानक डिजिटल बनवावे अशी मागणी सादिक शिलेदार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.