नेवासा: दैनिक सकाळचे पत्रकार ,व महा 24 तास चे संपादक, तसेच मांडण वॉचचे संचालक अमोल मांडण यांचे नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे,रविवारी सायंकाळी नेवासा येथे त्यांचा अपघात झाला होता, त्यानंतर त्यांना प्राथमिक उपचार नेवासा फाटा येथील काळे डॉक्टर यांच्या रुग्णालयात नेण्यात आले ,व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले, त्यानंतर त्यांचा उपचार अहमदनगर येथील हॉस्पिटल मध्ये उपचार चालू होता, त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या परंतु उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले, त्यांचे मागे आई ,बंधू कुणाल मांडण व,पत्नी, एक मुलगा एक मुलगी ,असा परिवार आहे,मध्यमेश्वर स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार
करण्यात आले त्यावेळी नेवासा शहर व तालुक्यातील सर्व समाजातील नागरिक ,तसेच नेवासा तालुक्यातील व जिल्ह्यातील पत्रकार, व संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मांडन यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.