चोरीच्या गुन्ह्यातील दोघे आरोपी खेडलेपरमानंद येथून मुद्देमालासह ताब्यात
गणेशवाडी (वार्ताहर) - नेवासा तालुक्यातील खेडले
परमानंद येथील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस सोनई
पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. पोलीस
सुत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार शेतकरी संभाजी भानुदास शिंदे यांनी सोनई पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची फिर्याद दाखल केली होती. यामध्ये गट नं. ३०२ मधील इलेक्ट्रिक मोटार स्टार्टर, लोखंडी कॉट चोरीस गेले होते. सदर
गोष्टींचा तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार
अंकुश दहिफळे हे करत होते. तपास करीत असताना गुप्त
बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की सदरचा मुद्देमाल हा
राहुरी तालुका हद्दीतील पिंपरी येथील शिवाजी शिंदे यांच्या
वस्तीवर राहणार असलेल्या इसमाच्या घरी आढळून आलेले
आहेत. सदरची माहिती मिळताच २२ जुलै रोजी सकाळी
सोनई पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे, तपास
अधिकारी सहाय्यक फौजदार अंकुश दहिफळे, कॉन्स्टेबल
गोरक्षनाथ जावळे, कॉन्स्टेबल मृत्युंजय मोरे यांच्या पथकाने
तातडीने घटनास्थळी धाव घेत मुद्दे मालासह आरोपींना
ताब्यात घेतले. आकाश गोरख पवार व शरद बाळासाहेब
सूर्यवंशी या संशयीत आरोपींना सोनई पोलीस स्टेशनला
मुद्देमालासह हजर केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस
निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक
फौजदार श्री. दहिफळे करीत आहेत.