अहमदनगरमध्ये मोठी अंगणवाडी भरती ! ‘असे’ होणार गुणांकन

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यामध्ये रिक्त असलेल्या ७२७ अंगणवाडी मदतनिसांची भरती प्रक्रिया सध्या सुरु झाली आहे.एकात्मिक बाल विकास सेवेअंतर्गत ही पद भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आली असून त्यावर प्रक्रियाही सुरु झाली आहे.या भरतीअंतर्गत बारावी उत्तीर्ण महिलेला गावातच नोकरीची संधी मिळणार आहे. भरतीसाठी समिती असून अर्ज केलेल्या उमेदवारांचे
गुणांकन कसे करायचे याचे निकष निश्चित आहेत. त्यामुळे या भरतीत वशिलेबाजी करण्यास कुणालाही वाव नाही.
राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध मागण्यांकरिता आक्रमक पवित्रा धारण करत मागील वर्षी मोठे आंदोलन केले. त्यात त्यांच्या अनेक मागण्या मान्य करत शासनाने राज्यातील ज्या काही १३ हजार मिनी अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन
करून त्यांना अंगणवाडी सेविका म्हणून मान्यता दिली.
शिवाय १३ हजार अंगणवाडी मदतनीस पदे नव्याने निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता ही भरती जिल्ह्यात सुरू झाली आहे.नगर जिल्ह्यात साडेपाच हजार अंगणवाड्या आहेत. त्यात अंगणवाडी सेविकांच्या एकूण ५ हजार ३७५ मंजूर पदांपैकी २३३ पदे रिक्त आहेत. तर ५ हजार ३७५ मदतनिसांच्या मंजूर पदांपैकी ४ हजार ६४८
पदे भरलेली व ७२७ पदे रिक्त आहेत.
अंगणवाडी मदतनिसांची निवड गावातीलच महिलांमधून होणार आहे.किमान अर्हता १२ वी उत्तीर्ण ठेवण्यात आलेली आहे. कागदपत्रांच्या आधारेच गुणाकांन होते. यामध्ये मुलाखती होत नाहीत. कुणी ठरवले तरी वशिलेबाजी करता येत नाही.
अशी होणार निवड
मदतनीस पदासाठी एकूण १०० गुणांचे मूल्यांकन होणार आहे. यात बारावीत ८० टक्केपेक्षा अधिक गुण असतील तर ६० गुणांकन होईल.याशिवाय उमेदवार पदवीधर, डी. एड., बी.एड., एमएस सी आयटी धारक असेल तर अतिरिक्त गुण मिळतील. विधवा,अनाथ, तसेच अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, मिनी अंगणवाडी सेविकेचा अनुभव असल्यास अशा विविध बाबींचे गुणांकन करून अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
त्यासाठी उमेदवारांनी बारावी व बारावींनतरची सर्व गुणपत्रके
व्यवस्थित जोडवे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.