जिल्ह्यातील आयकर भरणारे किंवा शासकीय नोकरी करणाऱ्या ४९१४ जणांचे धान्य बंद करण्यात आले आहे. यासंदर्भातील यादी राज्य शासनाकडून जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाली होती. तेव्हापासून त्यांचे रेशन वाटप थांबवण्यात आले आहे.जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत एकूण ७ लाख २४ हजार रेशन कार्डधारक आहे. मागील काही दिवसांत अनेक आयकर दाते रेशनचा लाभ घेत असल्याची बाब समोर आली होती. परंतु, रेशन कार्डसह धान्य वाटपाची प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने लाभार्थ्यांचे आधार कार्ड सलग्न आहे. त्यातून राज्य शासनाने अनेकांची ओळख पटवली. त्यानंतर त्यांना मिळणाऱ्या रेशनच्या धान्याचा लाभ तातडीने रोखण्यात आला.
*अहमदनगर जिल्ह्यात आयकर भरणाऱ्यांचे धान्य बंद !*
0
August 05, 2024
अहमदनगर
Tags