नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथील साळवे वस्ती ,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री गोरक्षनाथ नवघरे हे सेवा निवृत्त झाले त्यांचा सेवापुर्ती समारंभ पार पगला ,त्यांनी आयुष्यात पूर्ण शिक्षणासाठी वेळ देणारे, त्यांनी ग्रामिणभागात वस्ती शाळा सुरू करून सुमारे१७ वर्षे प्रामाणिक पणे विद्यादान ,ज्ञानदान केले ,त्यांचा मक्तापूर ,ग्रामस्थ सर्व शिक्षक मराठा सुकाना समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवसेना नेते गणेश झगरे मक्तापूर ग्रामस्थांच्या वतीने गोरक्षनाथ सरांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला,यावेळी गणेश भाऊ झगरे म्हणाले की गोरक्षनाथ नवघरे सरांनी आयुष्यभर शाळेमध्ये गोरगरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण दिले व प्रत्येकांना मदत केली व माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला नवघरे सरांचं मला मार्गदर्शन होतं व एक शिक्षक सेवानिवृत्त होतो म्हणून मक्तापूर ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू आले व सरांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या व त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला असे झगरे म्हटले यावेळी उपस्थिती मराठा सुकाना समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झगरे, नेवासा मार्केट कमिटी संचालक भरत काळे प्रगत शेतकरी बाळासाहेब देवराव बर्डे रवी कर्डक मक्तापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुभाष चव्हाण रविराज शिक्षक जगदाळे मॅडम सचिन गायकवाड मनोज झगरे शकूर इनामदार, गंधारे सर, आजिनाथ झग रे आदी मक्तापूर ग्रामस्थ या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते,