लोखंडी झाकणाने आरोपीचा खून, मध्यवर्ती कारागृहातील खळबळजनक घटना

गेल्या महिनाभरापासून शेकडोंच्या संख्येने मोबाईल सापडत असल्याच्या घटना समोर येत असल्याने अगोदरच सुरक्षेचे प्रश्न चिन्ह निर्माण झाले असतानाच कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या गुन्हेगारीने आता डोके वर काढले आहे. रविवारी सकाळी अंघोळीसाठी हौदावर आलेल्या मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता (वय – 70) या कैद्याचा ड्रेनेजवरील लोखंडी झाकणाने मारहाण करुन खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

विशेष म्हणजे मुंबई साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणी हा कैदी येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याच्या खुनाचे कारण समजले नसले तरी सुपारी घेऊनच या कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्यांच्या टोळक्याने हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. न्यायालयीन बंदी आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार, सौरभ विकास सिद्ध या पाच जणांनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.





        
        
        
        
            
                        
            

                                                    

    

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.