*माजी मंत्री तथा नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांचे कट्टर समर्थक कुकाना गावचे उपसरपंच सोमनाथ कचरे यांचा आज भाजपा मध्ये प्रवेश*
नेवासा .
नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला यावेळी आमदार मुरकुटे व जिल्हाध्यक्ष लंघे यांनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले. तसेच भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.या स्वागत सत्काराला निवडीला उत्तर देत कचरे म्हणाले की 2014 ते 2019 या काळात तालुक्याचा झालेला विकास तसेच 2019 ते 2024 या काळात झालेला तालुक्याचा झालेला विकास यात खूप मोठी तफावत आहे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नेतृत्व हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे तळागाळातील जनतेची त्यांच्यासोबत नाळ जोडलेली आहे त्यांच्या विकास कामांकडे बघून मी आज स्वगृही परतल्याचे मत कचरे यांनी व्यक्त केले
यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब गव्हाणे नेवासा तालुका प्रसिद्धीप्रमुख रितेश भंडारी आप्पासाहेब कावरे पांडुरंग कावरे सुरेश लिपणे अरुण गरड भागवत खराडे विकास भागवत. भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते चंपुशेट बोरा,अण्णा पाटील गव्हाणे,बाळासाहेब क्षीरसागर,अरुण गरड, मच्छिंद्र कचरे, अंबादास म्हस्के शिवसेना तालुका अध्यक्ष संजय पवार, गणपत खराडे डॉ.बाळासाहेब कोलते,राजू मिसाळ, तुकाराम कन्हेरकर,महेश कचरे संदीप जावळे ,सुरेश लीपणे,दत्तात्रय लांघे, उमेष चावरे, गणगे नाना,भागवत खराडे, अरूनराव चोपडे,सुरेश वाबळे, दत्तात्रय पोटे,किरण खाटीक, विलासराव देशमुख, अनिल गर्जे, अनिकेत भारस्कर,बाबासाहेब पडूळे, दत्तात्रय लांघे शरद गरड आदी उपस्थित होते. इत्यादी उपस्थित होते यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.