महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. आता विधानसभेच्या अनुशंघाने सर्वच पक्षांची तयारी सुरु झालीये. आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. आगामी निवडणुकांच्या अनुशंघाने या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.
दरम्यान आता एका दाव्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. मंत्रिपदासाठी रोहित पवार अजितदादांच्या संपर्कात असल्याचा हा दावा केलाय. भाजप आमदार नितेश राणे यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे.
रोहित पवारांबाबत काय केलाय दावा?
मंत्रिपद मिळवण्यासाठी रोहित पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे. ते सिंधुदुर्गमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ते अजित पवारांच्या बाजुला दिसतील असाही दावा त्यांनी केलाय.
त्यामुळे आता पुन्हा एखादा राजकीय भूकंप होणार का? याकडे लक्ष लागले आहे. नितेश राणे यांनी जो दावा केलाय त्यात किती तथ्य आहे? रोहित पवार यावर काही बोलणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.