नेवासा प्रतिनिधी-
नेवासा- मुलाच्या त्रासाला वैतागून पित्याने मुलाचा खून केले बाबत...
नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथील शिवाजी दादासाहेब जाधव रा. गोधेगाव ता.नेवासे याच्या शेती वाटपाच्या कारणावरून होणाऱ्या भांडण-तंट्याच्या त्रासाला कंटाळून दादा सारंगधर जाधव यांनी मुलगा शिवाजीच्या डोक्यावर मंगळवार दि. १४/५/२४/ रोजी सायंकाळी ५.००. वाजण्याच्या सुमारास फळीने मारहाण करून खून केला आहे.
दि.१८ मे रोजी मृतदेहाचा सर्वत्व दुर्गंधी वास पसरल्याने गुन्ह्यांची उकल झाली.
मृत्यूकची आई अलका दादासाहेब जाधव हिचे फिर्यादीवरून आरोपीस ताब्यात घेऊन दादा जाधव याच्या नेवासे पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४८३/२०२४ भा.द.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील
तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्रसिंग ससाने हे करीत आहेत.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.