नगर : देशभरात आज पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल करण्यात आले आहेत. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) आणि इंडियन ऑइल (आयओसी) कडून इंधनाच्या किंमती जारी केल्या जातात. त्यानुसार नगर जिल्ह्यात पेट्रोल १०४.७६ रुपये प्रती लीटर तर डिझेल ९१.२६ रुपये प्रती लीटर प्रमाणे मिळत आहे.
पेट्रोल व डिझेलचे दर प्रती लीटर एक रुपया प्रमाणे वाढले आहेत. ही किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती सकाळी सहा वाजताच अपडेट केल्या जातात. तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ किंवा कमी करत असतात.