सोनई (वार्ताहर) - तरुणाचे अपहरण करून खंडणीची मागणी केली. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. , दि. २४ मे रोजी सकाळी ७.३० वाजता फिर्यादी अनिरुद्ध विठ्ठलराव जरे (वय २५, रा. गुलमोहर रोड, अहमदनगर) हे आपल्या मूळगावी तुकाई शिंगवे येथे काही कामानिमित्ताने आले होते. परत अहमदनगर येथे जाण्यासाठी पांढरीपूल येथे आले असता, एका गाडीतून अज्ञात अंदाजे ३५ वर्षीय दोन तरुणांनी तुम्हाला अहमदनगर येथे सोडतो, असे सांगून गाडीत बसवले. गाडी इमामपूर घाटाच्यावरील बाजूस थांबवून त्यांना बंदुकीसारखे हत्यार दाखवून गळ्यातील चेन, सोन्याची अंगठी, मोबाईल, पैशाचे पाकीट, एटीएम कार्ड, कपड्यांची पिशवी, चावी हे सर्व बळजबरीने काढून घेतले. वडीलास फोन करून फिर्यादीस सोडण्याच्या बदल्यात पंधरा लाख रुपयांची मागणी करत गळा दाबून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बंदुकीचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३६४ (अ), ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसइ एस. पी. मेढे करत आहेत.