एकात्मिक पद्धतीने पिक व्यवस्थापन काळाची गरज: श्री. नारायण निबे, के. व्ही.के. दहिगाव ने*

*एकात्मिक पद्धतीने पिक व्यवस्थापन काळाची गरज: श्री. नारायण निबे, के. व्ही.के. दहिगाव ने* 

भारत सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने यांचे मार्फत खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये २०० हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ५०० शेतकऱ्यांच्या शेतावर समुह आद्यरेषा पिक प्रात्यक्षिक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रात्यक्षिकाचे नियोजन कृषि विद्या विभाग मार्फत कोळगाव व हसनापुर ता. शेवगाव येथे करण्यात आले आहे. 
हसानापुर येथे  *"सोयाबीन एकात्मिक पिक उत्पादन तंत्रज्ञान"* या विषयावर समुह चर्चा  प्राथमिक आरोग्य केंद्र, हसनापुर ता. शेवगाव येथे करण्यात आली. 

सदर कार्यक्रमात श्री. नारायण निबे, विषय विशेषज्ञ (कृषि विद्या), कृषि विद्या विभाग , के. व्ही. के . दहिगाव ने यांनी तूर, उडीद व सोयाबीन पिक प्रात्यक्षिकात सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची त्यांनी माहिती दिली. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक प्रक्षेत्रातील माती नमुना कसा घ्यावा या विषयी सुद्धा माहिती देण्यात आली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान मार्गदर्शक तत्वानुसार सदर गावातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतावर सदर प्रात्यक्षिक राबविण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सर्वांना सांगण्यात आले.  सदर  हसनापूर गावातील प्रगतशील महिला शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
सदर कार्यक्रमास १०० प्रगतशील महिला शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात एकात्मिक अन्नद्रव्य, तण नियंत्रण, बिज प्रक्रिया तसेच माती पाणी परीक्षण या विषयी माहिती देण्यात आली. शेतीमध्ये यंत्राचा वापर, एकात्मिक किड नियोजन, कडधान्य व गळीतधान्य पिकांचे अहारातील महत्त्व या विषयावर देखील महिला शेतकऱ्यांना श्री. नारायण निबे यांनी मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमास पंचायत समिती शेवगाव येथील महिला अधिकारी देखील उपस्थित होत्या.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.