बियाणे विक्रीचा परवाना नसलेल्या व नेवासे फाटा येथे कपशी बियाणांचा काळाबाजार करणाऱ्या दोन कृषी सेवा केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील नेवासे खुर्द येथे बियाणे विक्रीचा परवाना नसलेल्या बेकायदेशीर कापूस बियाणे विक्रेत्यावर गुणवत्ता नियंत्रण पथकाने छापा टाकून ९४ हजार १७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर नेवासे फाटा येथे कपाशी बियाण्याची वाढीव दराने विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर छापा टाकून १ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत नेवासे पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रताप रामदास कोपनर यांनी नेवासे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बाळासाहेब ढगे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना जादा दराने नेवासे खुर्द व नेवासे फाटा येथे बियाणे विक्री होत असल्याचे कळवले. बुधवारी रात्री दहा वाजता महेंद्र कानडे, नेवासे याला राहत्या घरी इतर अधिकार व पोलिसांच्यासह जाऊन त्यांच्या गाडीतील मुद्देमालासह अटक केली. त्याच्याकडे बियाणे विक्रीचा परवाना नसताना तो बियाणे विकत होता. त्याच्याकडून विकत आणलेल्या मालाची पावती तसेच सुमारे १०९ पाकीट जप्त करण्यात आले, तर नेवासे फाटा येथील श्रीदत्त कृषीसेवा केंद्र येथेही छापा टाकला. सीड प्राइवेट लिमिटेड, आंध्रप्रदेश या कंपनीचे कपाशी बियाणे ८६४ ऐवजी ११०० रुपये प्रमाणे विकताना आढळून आला. या दुकानात १६४ पाकीट जप्त करण्यात आले. कानडे यांच्याकडे
जप्त केलेल्या पाकिटांची किंमत ९५ हजार रुपये आहे, तर शेजूळ यांच्याकडे जप्त केलेल्या १६४ पाकिटाची किंमत १ लाख ४१ हजार रुपये आहे. या दुकानचे मालक मिळून आल्यामुळे दुकानातील कर्मचारी गौरव मापारी याला ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. ही कारवाई श्रीरामपूरचे उपविभागीय कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, राहुरी पंचायत समितीचे गुणनियंत्रण निरीक्षक गणेश नारायण अनारसे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल बाळासाहेब ढगे, नेवासे पंचायत समितीचे गुणनियंत्रण निरीक्षक प्रताप रामदास कोपनर, ए. एस. कर्डिले, पी. सी. वैद्य, वर्षा कांबळे या पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात