"पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी"
पिचडगाव ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आदर्श शिक्षक श्री टिल्लू दादा गव्हाणे यांनी सपत्नीक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले
या वेळी गावातील महिला व नागरिक उपस्थित होते आदर्श शिक्षक श्री गव्हाणे गुरूजी यांनी महापुरुषाविषयी आपले विचार व्यक्त केले.
तसेच मराठा सुकानु समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री गणेश झगरे यांनी ही उपस्थित राहुन आपले विचार मांडले या कार्यक्रमा प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या सौ विजयाताई भाऊसाहेब शेजूळ व मुक्तताई शेजूळ मा.सरपंच भिमभाऊ बनसोडे ग्रा. प. शिपाई गोरख गव्हाणे श्री नारायण टिळेकर श्री जनार्दन बनसोडे श्री संदीप बनसोडे श्री गोपीचंद गव्हाणे श्री संदीप सरोदे श्री संजय साबळे व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विराट सामाजिक प्रतिष्ठानचे श्री सागर सरोदे यांनी केले तर आभार प्रदर्शन आर.पी आय चे जिल्हा कार्याध्यक्ष श्री संजयजी बनसोडे यांनी आभार मानले.