ठिबकच्या साहित्याची लांडेवाडीतून चोरी
सोनई: लांडेवाडी (ता. नेवासे) येथील शेतात ठेवलेल्या ६० हजार रुपये किमतीच्या ठिबक सिंचन साहित्याची चोरी झाल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.शेतकरी दत्तात्रय आसाराम लांडे
यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.लांडेवाडी शिवारातील शेतात
सन २०१९ साली ६० हजार रुपये किमतीच्या रिओलिस कंपनीचे २० एमएम आकाराच्या ठिबक
सिंचन नळ्या बसविल्या होत्या.शेतीत सध्या पीक नसल्याने
ठिबक सिंचन नळ्या गुंडाळून विहिरीजवळ ठेवल्या असता तेथे
गेल्यानंतर तेथे नळ्या नसल्याचे लक्षात आले, असे फिर्यादीत नमूद केले. हवालदार काकासाहेब राख
अधिक तपास करत आहेत.