नेवासा
स्वर्गीय बिशप डॉ. थॉमस भालेराव एस जे यांच्या स्मरणार्थ भव्य राज्यस्तरीय भजन स्पर्धा मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे.प्रवेश फी. १००१ रुपये आहेत. स्पर्धेचे पहिले बक्षीस २१००० रुपये ,दुसरे बक्षीस १४००० रुपये ,तिसरे बक्षीस ७००० रुपये, चौथे बक्षीस ३००० रुपये ,ठेवण्यात आले आहे इतर बक्षीसे उत्तम गायक ३००१ रुपये,उत्तम पेटी वादक ३००१ रुपये .तबला, नाल ,पकवाज यापैकी एक ३००१ रुपये ,असे बक्षीस ठेवण्यात आली आहेत. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे उद्घाटक नाशिक धर्मप्रांताचे माजी महागुरू स्वामी सन्माननीय रा. रे. डॉ.
लुर्डस डॅनियल उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती नेवासा तालुक्यातील माजी मंत्री मृद व जलसंधारण महाराष्ट्र राज्य मा . श्री शंकररावजी गडाख साहेब उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नेवासा धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू फा. दिलीप जाधव याप्रमाणे नेवासा धर्मग्राम समितीचे उपाध्यक्ष श्री. मिखायल पातारे सर व प्रिन्सिपल. सेंट जोसेफ स्कूल, नेवासा सि. फ्लोरा बोर्जेस आणि अध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, मुंबई मा. आ.श्री. रोहित दादा पवार आणि संचालक, सि.एस.आर.डी., अहमदनगर चे डॉ.सुरेश पठारे इत्यादी उपस्थित राहणार आहेत .स्पर्धेचे नियम :
१.भजन मंडळीला १२ मिनिटे वेळ देण्यात येईल.त्यातच वाद्याची ठेवण व सादरीकरण असेल
२. भजन बायबल वर आधारित असावे कोणत्याही भजनाला चित्रपटाच्या गाण्याची चाल नसावी
३. भजनी मंडळात कमीत कमी ८, जास्तीत जास्त १२ सदस्य असावेत.
४. एकच व्यक्ती दोन संघात आढळला तर तो संघ बाद करण्यात येईल, म्हणजे भजन गाण्यासाठी व वाद्य वाजविण्यासाठी दोन संघात बसू नये.
५. भजन स्पर्धेला येताना स्थानिक धर्मगुरू,पास्टर चे शिफारस पत्र नावासहित अनिवार्य आहे. त्यामुळे ते भजन मंडळ ख्रिस्ती आहे याची आयोजकाला खात्री होईल .
६. भजन भजन सादर करत असताना कुठलेही व्यसन केलेले चालणार नाही असे निदर्शनास आल्यास संपूर्ण संघ बाद करण्यात येईल.
७. भजन सादर असताना पारंपारिक वाद्यांचा समावेश असावा, इलेक्ट्रॉनिक्स वाद्य वाजवण्यास सक्त मनाई आहे.
८ परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
श्री मार्कस बोर्डे ,श्री रवी पवार ,श्री विलास घोरपडे, श्री उत्तम गायकवाड, श्री राजेंद्र पवार, श्री.संजय तुपे, श्री संजय तुपे ,श्री.मधुकर कोल्हे ,श्री.किरण वंजारे श्री.थॉमस वंजारे ,श्री.प्रभाकर पाटोळे, श्री. सदाभाऊ सोनवणे, श्री. योहान मोरे, श्री. एकनाथ बोर्डे ,श्री. अविनाश साळवे, श्री. लक्ष्मण गायकवाड, श्री. वैभव मगर ,श्री .राजू कांबळे, श्री .मच्छिंद्र गोरे, श्री .विजय लोंढे, श्री. यशुदास शहाराव, श्री .हरीश पंडित,श्री .राजेंद्र पंडित, श्री .शरद वंजारी, श्री .संजय घोरपडे, श्री .सचिन धोंगडे ,श्री .पप्पू कांबळे ,श्री. सतीश वंजारे ,श्री. डॅनियल कोल्हे, अक्षय बनसोडे ,समाधान जाधव, प्रसाद वाघमारे ,आशिष गायकवाड ,इत्यादी उपस्थित राहणार आहेत .या कार्यक्रमाचे आयोजक ज्ञान माऊली चर्च, नेवासाचे सहाय्यक धर्मगुरू फा.जॉन गुलदेवकर आहेत तरी आपण सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे ही नम्र विनंती .