नेवासा तालुक्यातील मंगळापुर येथे नवविवाहित तरुणीची आत्महत्या

नेवासा
नेवासा तालुक्यातील  मंगळापुर येथे नवविवाहित तरुणीची आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची  घटना घडली आहे , याबाबत सविस्तर माहिती अशी की दिपाली प्रशांत शिंदे  हिचा पाण्यात पडून मृत्यू झाला आहे,  यावरून मामा भाऊराव शिंदे यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार दिली आहे, त्या फिर्यादीमध्ये मध्ये असे म्हटले आहे की ,भाउराव उर्फ पुरुषोत्तम चिंधे राहणार माळी चिंचोरा , 
नेवासा पोलीस स्टेशनला हजर होवुन फिर्याद लिहुन देतो कि मी वरील ठिकाणी घरामध्ये पत्नी-जया,मुलगा-सुदर्शन असे एकत्र राहवयास असुन शेती करुन परिवाराची उपजिवीका भागवतो,माझी मोठी बहिण नाम मिना अशोक फुकटे ही त्याचे पती मुलांबाळासह शिरसगाव येथे राहवयास असुन बहिण मिना हिची ,मुलगी दिपाली हिचा विवाह 12 मार्च 2020 मध्ये प्रशांत कडुबाळ शिंदे राहणार मंगळापुर नेवासा याचे सोबत सप्तपदी लॉन्स नेवासा फाटा येथे मोठ्या थाटामाटात करुन दिले होते ,लग्नाच्या वेळी भाचीच्या सासरच्या लोकांना मानपान देवुन लग्नामध्ये देण्यात आल्या होत्या, भाची दिपाली हिच्या सासरी घरामध्ये तीचा नवरा प्रशांत कडुबाळ शिंदे ,सासरा-कडुबाळ सुर्यभान शिंदे ,सासु-शिंधुबाई कडुबाळ शिंदे, असे राहवयास असुन प्रशांत शिंदे याचे
शिरसगाव येथे कृषीसम्राट कृषीसेवा केंद्र असुन ,त्यावर परिवाराची उपजिवीका भागवतो, सदर दुकानाची जागा हि सर्व
संसारउपयोगी भाडोत्री आहे, 
12 मार्च 2020 रोजी भाची दिपाली हिचा विवाह झाले नंतर सुमारे 8 महिने तीच्या सासरच्या लोकांनी तीला व्यवस्थित नांदविले, त्यांनतर तीचा नवरा प्रशांत हा भाची दिपाली हिने दुकान बांधण्यासाठी तसेच दुकानाकरीता जागा घेण्यासाठी माहेर हुन 10 लाख रुपये आणावे ,या कारणाकरीता त्रास देवु लागले त्याबाबत ती अधुनमधुन मला तसेच दाजी अशोक फुंकटे यांना फोन करुन सांगत असे, त्यांनतर मी तसेच आमचे नातेवाईकांनी
त्यांचा घरी जावुन आम्ही तुम्हाला मोठा मानपान देवुन थाटामाटात लग्न केले आहे, आता आमचेकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे नाहीत तुम्ही आमचे मुलीला चांगले नांदवा असे समजावुन सांगितले होते,परंतु त्यांचे वर्तनामध्ये काही एक बदल झाला नाही, त्यांनतर भाची हिने माहेर हुन दुकानाकरीता जागा घेण्यासाठी तसेच दुकान बांधण्यासाठी 10 लाख रुपये आणावेत तसेच तीला ,आजुन मुलबाळ होत नाही याकारणाकरीता तींचा शारिरीक मानसिक छळ करुन मारहाण करत असे त्याबाबत ती आम्हाला फोनवर तसेच समक्ष भेटल्यावर सांगत असे, परंतु तीच्या सासरच्या लोकांचे वागणे आज ना उद्या बदलेल या कारणाने ती त्याचा त्रास सहन करुन नांदत होते, दिनांक 4 रोजी सकाळी 9 वा सुमारास मी माझे घरी असतांना माझा मोबाईल यावर भाची दिपाली हिचा फोन आला ,त्यावेळेस ते अशी सांगत होती तीच्या सासरचे लोक जागा घेण्यासाठी तसेच दुकान बांधण्यासाठी माहेरहुन,10 लाख रुपये आणावेत तसेच तीला मुलबाळ होत नाही या कारणावरुन मारहाण केली ,असलेबाबत  तिने मला सांगितले होते, त्यावेळेस मी तिची समजूत काढून असे सांगितले की आपण उद्या नेवासा पोलीस स्टेशन येथे जावुन तक्रार देवु असे सामजावुन सांगितले होते, त्यानंतर दिनांक पाच रोजी मी माळी चिंचोरा येथे असतांना, साडेसहा वाजेच्या सुमारास माझा मुलगा सुदर्शन याचे मोबाईलवर कृष्णा अशोक लंघे, यांने फोन करुन सांगितले कि भाची दिपाली हिने त्यांच्या शिरसगाव शिवारातील, शेत तळ्यातील पाण्यात उडी मारली असुन तीला उपाचराकरीता साईसेवा हॉस्पीटल नेवासा फाटा येथे आणले आहे ,तुम्ही लवकर नेवासा फाटा येथे या असे कळविलेने लागलीच मी, व माझा मुलगा सुदर्शन असे तात्काळ साईसेवा हॉस्पीटल नेवासा फाटा येथे आलो त्यावेळी, तेथे माझे दाजी अशोक फुकटे तसेच इतर नातेवाईक तेथे गेलो असता, डॉक्टरांनी भाची दिपाली हि उपचारपुर्वीच मयत झालेचे सांगितले, यावरून प्रशांत शिंदे ,कडूबाळ शिंदे, सिंधुबाई शिंदे ,यांनी माझ्या भाचीला दहा लाख रुपये आणावे यासाठी तीचा शारीरिक, मानसिक छळ ,तसेच मारहाण केलेन त्यांच्या जाचास कंटाळुन तीस आत्महत्येस प्रवृत्त केलेने तिने आत्महत्या केली आहे ,अशी तक्रार नेवासा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे , यावरून कलम 304 अ, कलम 498 ,कलम 323 , कलम 34 प्रमाणे नेवासा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली आहे
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.