नेवासा तालुक्यात गावठी कट्टा बाळगणारा इसम अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई.

नेवासा
उस्थळ दुमाला, ता. नेवासा येथुन १ गावठी कट्टा व २ जिवंत काडतुस बाळगणारा इसम ताब्यात, याबाबत सविस्तर माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि / श्री. दिनेश आहेर, स्थागुशा अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणा-या इसमांविरुध्द जास्तीत
जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या बाबत माहिती घेताना दिनांक
१८/०१/२०२४ रोजी पेनि / श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे
कैलास आसाराम म्हस्के रा. उस्थळ दुमाला, ता. नेवासा हा त्याचे कब्जामध्ये विनापरवाना गावठी कट्टा व
काडतुस बाळगुन उस्थळ दुमाला ता. नेवासा येथील माध्यमिक विद्यालयाचे कमानी जवळ उभा आहे आता
गेल्यास मिळुन येईल. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोनि / श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे
पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/ दत्तात्रय गव्हाणे, ज्ञानेश्वर शिंदे, देवेंद्र शेलार, पोना / रविंद्र कर्डीले, संदीप दरंदले,
फुरकान शेख व पोकॉ/किशोर शिरसाठ अशांचे पथक नेमुन पंचाना सोबत घेवुन, बातमीतील संशयीताची
माहिती घेवुन तो मिळुन आल्यास त्यास ताब्यात घेवून खात्री करून कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना
देवुन पथकास रवाना केले.
पोलीस पथकाने किसनगिरी माध्यमिक विद्यालय, उस्थळ दुमाला, ता. नेवासा येथे जावुन खात्री
करता बातमीतील वर्णना प्रमाणे एक संशयीत इसम मिळुन आला. त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात
घेतलेल्या संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे
नाव कैलास आसाराम म्हस्के वय ३० रा. उस्थळ दुमाला, ता. नेवासा असे असल्याचे सांगितले. त्यांची
पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत ३०,०००/- रुपये किंमतीचा एक देशी बनावटीचा कट्टा व
१,०००/- रुपये किंमतीचे २ जिवंत काडतुस असा एकुण ३१,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन
आल्याने त्यांचे विरुध्द पोना / ६५८ संदीप संजय दरंदले नेम. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे
फिर्यादीवरुन नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४१ / २०२४ आर्म अॅक्ट ३ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती
भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री. सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस
अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व
अंमलदार यांनी केलेली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.