आमदार शंकरराव गडाख साहेब यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पिचडगाव येथील, मुकिंदपुर गेवराई रस्ता ते माऊली आश्रम रस्ता भराव मुरमीकरण, तसेच माऊली आश्रम सभा मंडप बांधकाम ,या विकास कामाचे लोकार्पण महंत प्रकाशानंदगिरीजी महाराज, महंत गणेशानंदगिरिजी महाराज, महंत ज्ञानेश्वर महाराज हजारे, माजी आमदार पांडुरंगजी अभंग साहेब यांच्या शुभहस्ते आणि आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, यावेळी शेषराव बनसोडे यांनी नामदार शंकरराव गडाख यांचे स्वागत केले तसेच उद्घाटन प्रसंगी पिचडगावसह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळेस दत्तात्रेय हजारे,
ज्ञानेश्वर महाराज हजारे ,प्रकाश जी महाराज, पिचडगाव गावचे सरपंच पोपटराव हजारे, सभापती रावसाहेब पाटील कांगोणे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव सरोदे, भगवंतराव शेजुळ चेअरमन ,अक्षय साळवे ,सरपंच अनिल लहारे , माजी सरपंच दादा निपुंगे,शकूर इनामदार, तसेच मुकिंदपुर पिचडगाव ग्रामस्थानी आमदार शंकरराव गडाख यांचे आभार मानले, व इनामदार शकूर यांनी आमदार शंकरराव गडाख मागणी केली की ,मक्तापूर ते मसले रस्त्याचे काम लवकर मंजूर करा ,व नामदार शंकरराव गडाख यांनी काम मंजूर झालं लवकरच कामाला सुरुवात होईल, असं आश्वासन गडाखसाहेबांनी दिले.