*जय हरी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करणार- सौ. आशाताई मुरकुटे*
जय हरी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जयहरी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ आशाताई मुरकुटे यांनी केले.
नेवासा
भारतीय जनता पार्टी नेवासा व जय हरी महिला प्रतिष्ठान द्वारे हळदी कुंकू तसेच रांगोळी व नृत्य स्पर्धेचे आयोजन भेंडा येथील श्रीकृष्ण लॉन्स मध्ये आयोजित करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व मुलींनी सहभाग घेतला, यावेळी रत्नमालाताई लंघे भाजपाच्या महिला तालुकाध्यक्ष भारती बेंद्रे शिवसेना महिला तालुकाप्रमुख मीरा गुंजाळ ज्योती जाधव मनीषा फुलारी मंगल काळे सोनाली क्षीरसागर यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर सुभाष भागवत व डॉक्टर रजनीकांत पुंड यांचे आरोग्यविषयक व्याख्यान आयोजित केले होते यावेळी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत अंताक्षरी सातपुते भारती पूर्ण समृद्धी मिसाळ श्रुतिका काळे स्वाती गोंधन फुलारी स्नेहल खाटीक तसेच नृत्य स्पर्धेत शितल पाचरे उर्मिला शिंदे आदिती इथापे कांचन पवार इत्यादी मुलींनी बाजी मारली या स्पर्धेसाठी भाऊसाहेब काळे प्राचार्य संदीप फुलारी लवकर मॅडम डवले मॅडम आदींनी रांगोळी स्पर्धेचे परीक्षण केले नृत्य स्पर्धेसाठी प्रख्यात गायिका ममता खेडेकर प्रिया मनोहर डॉक्टर रजनीकांत पुंड परीक्षक म्हणून लाभले विजेते स्पर्धकांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जय हरी महिला प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी महिलांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले याबद्दल जय हरी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बाळासाहेब मुरकुटे यांनी सर्वांचे आभार मानले.