नेवासा येथे वंचित बहुजन आघाडीचे बेमुदत आमरण उपोषण

 (प्रतिनिधी) रमेश राजगिरे
नेवासा
नेवासा येथे वंचित बहुजन आघाडी कडून आमरण उपोषण करण्यात येत आहे याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नेवासा तहसील कार्यालय यांना निवेदन दिले आहे या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की जोपर्यंत कुटुंबांचा रस्ता खुला होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी  बेमुदत आमरण  उपोषण करणार आहे
प्रति,
मा.तहसिलदार साहेब,
तथा तालुका दंडाधिकारी साहेब
नेवासा ता. नेवासा जि.अ.नगर
संदर्भः रस्ता केस क्र. ७१/२०१७ दि. १८/०६/२०१८ चा आदेश
विषयः
१) दि. ०५/०१/२०२४ रोजी पंचनामा झालेल्या रस्त्यासंदर्भात ज्या-ज्या
लोकांनी हरकती तयार केल्या. अशा लोकांवर भा.द.वि.कलम ३५३ प्रमाणे तात्काळ
गुन्हे दाखल करणेबाबत.
२) मा. नेवासा बु. मंडळ अधिकारी यांच्या व्हि.डी.ओ. मधील अहवालानुसार सर्व
दोषींवर गुन्हे दाखल करणेबाबत.
३) मौजे घोगरगांव ता. नेवासा येथील गट नं. २५५ मध्ये रस्ता खुला करुण
कनगरे कुटुबियांना तत्काळ न्याय मिळणेबाबत.
दि. २३/०१/२०२४
महोदय,
वरील विषयास अनुसरुन निवेदित करतो की, मौजे घोगरगांव ता. नेवासा
येथील गट नं. २५५ मध्ये मा. तहसिलदार साहेब यांचा आदेश रस्ता केस क्र. ७१ /२०१७
दि.१८/०६/२०१८ चा आदेश असतानाही वारंवार रस्त्याची अडवणुक करुन
मा. उपविभागिय अधिकारी (प्रांत साहेब) यांनी वारंवार येऊन तहसिलदार साहेब
आदेश असताना घोगरगांव येथील गावगुंड व आडदांड प्रवृत्तीच्या लोकांनी
रस्ता गेल्या ४ वर्षापासुन कणगरे कुटुंबियांना रस्त्यासाठी हरकत व अडथळे
निर्माण केलेले आहे. तसेच कणगरे यांचे वडलोपार्जित शेती व रस्ता असतानाही
त्यांना जाण्यासाठी तेथील गावगुंड ४ वर्षापासुन त्रास देत आहे. मा. तहसिलदार व
उपविभागिय अधिकारी यांच्या समोर ते जातीवाचक शिवीगाळ करतात व तहसिलदार साहेब
यांचा आदेश पायदळी तुडवितात व त्यांचा अपमान करतात. तरीही त्यांच्यावर आजपर्यंत
गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल झालेले नाहीत. त्यामुळे त्यांना कुठलाही कायद्याचा वचक
राहीलेला नाही. व कणगरे कुटुंबाचा रस्ता खुला झालेला नाही. तरी आज २३/०१/२०२४
रोजी आम्ही आमरण उपोषणासाठी (कणगरे कुटुंबिय व वंचित बहुजन आघाडी) मा. तहसिलदार
साहेब यांच्यासमोर जोपर्यंत रस्ता खुला होत नाही. तसेच आरोपींवर ३५३ प्रमाणे गुन्हे दाखल
होत नाही. तोपर्यंत आमचे उपोषण सुरु राहील. याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर व प्रशासनावर
राहील याची नोंद घ्यावी. तरी या निवेदनावर विविध वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहे
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.