*राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्सव समिती नेवासा यांचे वतीने संत गाडगे बाबा आश्रम येथे जयंती साजरी करण्यात आली*
नेवासा : नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील संत गाडगे बाबा आश्रम येथे राष्ट्रमाता जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सालाबाद प्रमाणे या ही वर्षी विविध उपक्रम यांचे आयोजन करत अनाथ आणि सर्व सामन्य कुटुंबातील विद्यार्थी ज्या विद्यालयात ज्ञानार्जन करतात तेथे धर्मरक्षक गणेश चौगुले सर मित्रमंडळ आणि जिजाऊ जयंती उत्सव समिती वतीने मिष्टान्न देऊन जयंती साजरी करण्यात आली.
या जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमांत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ कोरडे पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धाडस सामाजिक संघटनेचे नेवासा तालुका अध्यक्ष गणेश चौगुले यांनी केली. अध्यक्षीय निवड अनुमोदन निवृत्ती सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष बाळासाहेब निपुंगे यांनी दिले.
या वेळी शेतकरी संघटनेचे नेवासा तालुका अध्यक्ष त्रिंबक भदगले , बाळासाहेब निपुंगे मुख्याध्यापक कांबळे सर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी जिजाऊ मातेचे राष्ट्र प्रती कार्य विशद केले. अध्यक्षीय भाषणात जगन्नाथ कोरडे पाटील म्हणाले फार सुंदर उपक्रम जयंती उत्सव समिती आणि गाडगे बाबा आश्रम शाळा यांचे वतीने साजरा होतो. निराधार आणि गरीब मुलांना राष्ट्राचे नागरिक घडवून राष्ट्रहिताचे कार्य जबाबदारी येथील शिक्षक यांच्यावर आहे. उद्याचे सुजाण नागरिक निर्माण करण्याची जबाबदारी ज्ञानदान करणाऱ्या गुरुजन यांच्यावर आहे. संस्थेला आर्थिक मदत देऊन भविष्यकाळात विद्यार्थांना काही मदत लागली तर मला कळवा असे शेतकरी संघटना आणि जगन्नाथ कोरडे यांनी आश्वासन दिले.
जे महापुरुष असामान्य कार्य करतात त्या महामानव यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतात. जन्माने कोण्ही मोठा नसतो समाजासाठी जो कार्य करतो तो असामान्य कार्य करून भावी पिढीस आणि समाजाच्या हिताचे कार्य उभे करतो. स्वतःसाठी जो जगला तो मेला आणि समाजासाठी जो जगला तो खरे जगला असे गणेश चौगुले यांनी या वेळी विद्यार्थ्यांना सांगितले. गाडगे बाबा यांनी समाजासाठी आयुष्य वेचले. माणसातील देव राष्ट्र संत गाडगे बाबा यांनी कळला आणि ते त्यांनी समाजाला सांगितले. स्वराज्याचे स्वप्न ज्या मातेने बघितले आणि दोन छत्रपती देशासाठी बहाल केले अश्या मातेचा आपण आज जयंती उत्सव साजरा करत आहोत असे गणेश चौगुले यांनी आपल्या भाषणात सांगितले.
या वेळी काँग्रस चे जिल्हा सरचिटणीस रंजन जाधव,संभाजी ब्रिगेड चे उमेश ताकटे, अखिल भारतीय मराठा संघाचे शेषराव गव्हाणे, संतोष धनक , मुख्याध्यापक कांबळे सर, गमे सर, जगताप सर, गोरडे मॅडम, खंडवे मॅडम संत गाडगे बाबा आश्रम येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.