Beed : अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडमधील ससेवडी गावाजवळ कंटेनर आणि पिकअपची समोरासमोर जोरादार धडक झाली. या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अधिकची माहिती अशी की, ससेवाडी गावाजवळ कंटेनर आणि पिकअपचा समोरा समोर अपघात झाला. या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. सध्या गाड्यामधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मृत्यू झालेले लोक महाजनवाडी गावातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.