अबब...अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ! चक्क तहसील कार्यालयाची काढणार प्रतिकात्मक प्रेत याञा...


अबब...अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ! चक्क तहसील कार्यालयाची काढणार प्रतिकात्मक प्रेत याञा...

तहसील कार्यालयाची लक्तरे वेशीला !

नेवासा प्रतिनिधी।मागील वर्षेी अतिवृष्टीने तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याचे  कपाशी,तुर,बाजरी,मका,व फळ बाग या पिकांचे नुकसान झाले होते,सदर पिकांचे मागील वर्षी पंचनामे देखील करण्यात आले होते.अगोदरच पाऊस पडत नसल्याने खचून गेलेला बळीराजा पिकाप्रमाणे अर्धमेला झाला आहे.त्यात उशीरा का होईना बळीराज्याच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत परिसरातील शेतकरी वर्गावर शासनाची कृपा झाली आणि मागील वर्षी अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या पिकाची भरपाई मंजूर होऊन ही यादी मध्ये नावे येऊन ही नुकसान भरपाई आली नसून शेतकरी वर्गात नाराजी आहे. नुकसान भरपाई आली नसून त्वरित नुकसान भरपाई जमा करावी म्हणून तहसील कार्यालयात अर्धनग्न अवस्थेत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले होते.या वेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी मध्यथी केल्यामुळे आंदोलन स्तगित करण्यात आले होते व खा.लोखंडे यांनी आठ दिवसात मागील २०२२ वर्षी नुकसान भरपाई जमा होईल असे आंदोलनकरते यांना सांगितले.जवळपास चार महिने उलटून देखील नुकसान भरपाई जमा न झाल्यामुळे  येत्या आठ दिवसात तहसील कार्यालयाची प्रतिकात्मक प्रेत याञा(दशक्रिया विधी)आंदोलन करण्यात येईल असे निवेदन मुख्यमंत्री व तहसीलदार यांना पाठवण्यात आले.या वेळी कमलेश नवले,छञपती युवा सेनेचे नरेंद्र नवथर,प्रदिप आरगडे,अक्षय बोधक,राहुल कांगुणे,आप्पासाहेब आरगडे,अनेक शेतकरी उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.